नागपूर : मेंढेपठार अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ, एकूण सात मृत्यू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मेंढेपठार येथे लग्न वऱ्हाडाच्या वाहनाला झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता. यातील गंभीर जखमी माजी सरपंच जगदीश ढोणे यांच्यावर नागपूरातील मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यु झाला. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील सोनखांब परिसरात झालेल्या चारचाकी आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू … The post नागपूर : मेंढेपठार अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ, एकूण सात मृत्यू appeared first on पुढारी.

नागपूर : मेंढेपठार अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ, एकूण सात मृत्यू

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मेंढेपठार येथे लग्न वऱ्हाडाच्या वाहनाला झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता. यातील गंभीर जखमी माजी सरपंच जगदीश ढोणे यांच्यावर नागपूरातील मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यु झाला.
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील सोनखांब परिसरात झालेल्या चारचाकी आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी (दि. २२) मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान घडला. मेंढेपठार येथील अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, माजी जिप उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त आयोजित स्वागत समारंभासाठी नागपुरात आले होते. ही क्वालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात असताना ती एका ट्रकवर धडकली. यात क्वालिसमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा अक्षरश: चुराडा झाला.या अपघातात मयूर इंगळे (२२), वैभव चिखले (३२), सुधाकर मानकर (४२), विठ्ठल (४५), अजय चिखले (४०) व रमेश हेलोंडे यांचा मृत्यू झाला.
Latest Marathi News नागपूर : मेंढेपठार अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ, एकूण सात मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.