कोल्हापूर : पाटणेच्या पाणीपुरवठा संस्थेवर सरूडकर गटाचे निर्विवाद वर्चस्व!

सरूड; पुढारी वृत्तसेवा : पाटणे (ता.शाहूवाडी) येथील विश्वास साखर कारखाना संचलित शेतकरी सहकारी पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यानंतर संस्थेच्या झालेल्या पहिल्या सभेत बाळू मालजी पाटील यांची अध्यक्षपदी तर लक्ष्मी बाळू पाटील यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. संस्थेवर स्थापनेपासून माजी आमदार सरूडकर गटाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. दरम्यान मा. आ. बाबासाहेब पाटील-सरूडकर, … The post कोल्हापूर : पाटणेच्या पाणीपुरवठा संस्थेवर सरूडकर गटाचे निर्विवाद वर्चस्व! appeared first on पुढारी.

कोल्हापूर : पाटणेच्या पाणीपुरवठा संस्थेवर सरूडकर गटाचे निर्विवाद वर्चस्व!

सरूड; Bharat Live News Media वृत्तसेवा : पाटणे (ता.शाहूवाडी) येथील विश्वास साखर कारखाना संचलित शेतकरी सहकारी पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यानंतर संस्थेच्या झालेल्या पहिल्या सभेत बाळू मालजी पाटील यांची अध्यक्षपदी तर लक्ष्मी बाळू पाटील यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. संस्थेवर स्थापनेपासून माजी आमदार सरूडकर गटाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.
दरम्यान मा. आ. बाबासाहेब पाटील-सरूडकर, ‘विश्वास’चे चेअरमन आ. मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे मुख्य लेखाधिकारी भानुदास पाटील, प्रा. अशोक पाटील, सदाशिव पाटील, नंदकुमार पाटील, पांडुरंग दिंडे, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.
संस्थेचे नवनिर्वाचित सदस्य असे : रामू बापू पाटील, आनंदा बंडू पाटील, बाबू शंकर पाटील, बाबू पांडू पाटील, ज्ञानू चंद्रा दिंडे, बाजीराव नामदेव पाटील, नारायण ईश्वरा तळप, दगडू बाळू परीट, कविता नारायण पाटील.
Latest Marathi News कोल्हापूर : पाटणेच्या पाणीपुरवठा संस्थेवर सरूडकर गटाचे निर्विवाद वर्चस्व! Brought to You By : Bharat Live News Media.