चंद्रपूर : दुचाकी चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या

चंद्रपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : चंद्रपूर शहरात दुचाकी चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून 9 दुचाकीसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दुचाकी चोरीची घटनांना आळा बसावा, यासाठी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते. पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी निर्देशांची अंमलबजावणी करीत विशेष पथक स्थापन केले.
या पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे तपासली, गोपनीय बातमीदार नेमले. 2 जण हे विना कागदपत्रांची व विना नंबरची मोटारसायकल विक्री करीता बायपास चौक येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. अक्षय भलमे (वय 24), मंगेश मडावी (वय 19, रा. गडचिरोली) व सोबत असलेला 19 वर्षीय रोहित लोनगाडगे यांची चौकशी केली असता त्यांनी विविध पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहन चोरी केल्याचे कबुली दिली.
यावेळी आरोपीकडून राजुरा, बल्लारशाह, कुरखेडा, आष्टी, मुलचेरा, गडचांदूर अशा एकूण 9 दुचाकीसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांची टोळी विविध जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीत जात दुचाकी वाहन चोरी करीत होते. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महेश कोंडावार व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.
हेही वाचा
चंद्रपूर : सिंदेवाहीत तालुक्यात विद्युत शॉक लागून पट्टेदार वाघाचा मृत्यू
चंद्रपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तीन दिवसाच्या ताडोबा मुक्कामी
चंद्रपूर : पिटीचुवा जंगलात अवैध वाळूचे ट्रॅक्टरखाली दबून मजुराचा मृत्यू
Latest Marathi News चंद्रपूर : दुचाकी चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या Brought to You By : Bharat Live News Media.
