Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: केंद्र सरकारने भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) ची नवीन कार्यकारिणीचे आज निलंबिन केले. तसेच या संघटनेच्या सर्व निर्णयांना स्थगिती दिली. या निर्णयावर भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार भृजभूषण शरण सिंह यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. आज ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना बृजभूषण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Brij Bhushan On WFI Suspension)
क्रीडा मंत्र्यालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना बृजभूषण म्हणाले की, मी कुस्ती या खेळाच्या राजकारणापासून दूरच राहीन. कुस्तीसंदर्भात जे काही करायचे आहे किंवा निर्णय घ्यायचे आहेत ते सर्व नव्याने निर्माण करण्यात येणारी कार्यकारिणीच घेईल. माझाशी त्यांचा काहीही संबंध नाही. भाजप अध्यक्ष जेपी. नड्डा यांच्या भेटीनंतर ते आज (दि.२४) माध्यमांशी बोलत होते. (Brij Bhushan On WFI Suspension)
Whatever has to be done with regards to wrestling, it will be done by new body. I have nothing to do with it: Brij Bhushan Sharan Singh to PTI
— Press Trust of India (@PTI_News) December 24, 2023
Brij Bhushan On WFI Suspension: आम्ही अकादमी बंद करणार नाही
मी काम करत राहीन. आम्ही क्रीडा अकादमी चालवत राहू. या अकादमीमध्ये सध्या १०० ते १५० मुले प्रशिक्षण घेत आहेत. तसेच मी स्वत: कुस्ती खेळली आहे. कुस्तीच्या बळावरच मी आज इथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे आम्ही आमची अकादमी बंद करणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. (Brij Bhushan On WFI Suspension)
#WATCH दिल्ली: पूर्व WFI अध्यक्ष और भाजपा सांसद बृज भूषण शरण सिंह ने कहा, “…मैं काम करता रहूंगा। हम एकेडमी चलाते रहेंगे। एकेडमी में 100-150 बच्चे हैं और मैंने खुद कुश्ती खेली है, कुश्ती के बल पर ही मैं आज यहां पर पहुंचा हूं… हम अपनी एकेडमी बंद नहीं करेंगे… ” pic.twitter.com/0b3g5gZbUV
— ANI_HindiNews (@AHindinews) December 24, 2023
हेही वाचा:
WFI Suspension : विनेश फोगाट म्हणाली, “आमचा लढा महिला…”
WFI Controversy : केंद्राचा ब्रिजभूषण यांना दणका! WFI च्या नव्या अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचे निलंबन
Sakshi Malik Retired : साक्षी मलिकची कुस्तीतून निवृत्ती! WFI च्या नव्या अध्यक्षाच्या निवडीने नाराज
The post WFI कार्यकारिणी निलंबनावर बृजभूषण सिंह म्हणाले, “मी कुस्ती खेळाच्या…” appeared first on Bharat Live News Media.