नागपूर : कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या अध्यक्षपदी बावनकुळे यांची फेरनिवड

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या अध्यक्षपदी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी त्यांची ही निवड आहे. रविवारी (ता.२४) रोजी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानमध्ये विश्वस्त मंडळाची निवडणूक पार पडली. अध्यक्षपदी निवड झाल्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. नव्या कार्यकारिणीच्या … The post नागपूर : कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या अध्यक्षपदी बावनकुळे यांची फेरनिवड appeared first on पुढारी.

नागपूर : कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या अध्यक्षपदी बावनकुळे यांची फेरनिवड

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या अध्यक्षपदी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी त्यांची ही निवड आहे.
रविवारी (ता.२४) रोजी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानमध्ये विश्वस्त मंडळाची निवडणूक पार पडली. अध्यक्षपदी निवड झाल्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. नव्या कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी अजय विजयवर्गीय, सचिवपदी दतू समिरितकर, सहसचिवपदी प्रभाताई निमोने, कोषाध्यक्षपदी नंदकिशोर बजाज यांची निवड करण्यात आली. सभेला केशवराव फुलझेले महाराज, सुशीला मंत्री, डॉ. नंदिनी त्रिपाठी, स्वामी श्री निर्मलानद महाराज, लक्ष्मीकांत तडस्कर उपस्थित होते.
सर्व उपक्रम सुरू ठेवणार – बावनकुळे
यावेळी बावनकुळे म्हणाले की, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या विकासात सर्व विश्वस्त, दानदाते, देवस्थानचे कर्मचारी यांनी पदोपदी केलेली मदत माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली,,पुन्हा एकदा माझ्यासारख्या सामान्य भक्तावर आपण विश्वास दाखविला. मंदिराचा विकास करण्यासाठी येत्या काळातही आपले सर्वांचे प्रयत्न असेच सुरू राहतील. आई जगदंबेच्या आशीर्वादाने संस्थानच्या माध्यमातून सुरू असलेले विविध सामाजिक, वैद्यकीय, धार्मिक उपक्रम पुन्हा नव्या जोमाने आपण पुढे सुरू ठेवू.’ असा विश्वास व्यक्त केला.
 
हेही वाचा

 नागपूर जिल्‍हा बँक घोटाळाप्रकरण; सुनील केदार यांची आमदारकी रद्द
Sunil Kedar ब्रेकिंग : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस आ. सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा

Nagpur Bank Scam Case : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांच्यासह ६ जण दोषी

Latest Marathi News नागपूर : कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या अध्यक्षपदी बावनकुळे यांची फेरनिवड Brought to You By : Bharat Live News Media.