केदार यांची आमदारकी रद्द करण्याची भाजपला इतकी का घाई होती : नाना पटोले

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी तडकाफडकी रद्द झाली आहे. केदार प्रकरणामध्ये खालच्या कोर्टाने पाच वर्षांची सजा सुनावली आहे, त्यांना अपीलमध्ये जाण्याची परवानगी आहे. मात्र, आज रविवार असतानाही भाजपला एवढी काय घाई झाली होती की, त्यांनी आज त्यांचे सदस्यत्व रद्द केले, ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतलेले नाही म्हणून का ? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला. Nana Patole On BJP
भाजपचे काछडीया नावाचे खासदार त्यांना हायकोर्टाने तीन वर्षांची सजा सुनावली होती. पण त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले नव्हते. त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याची परवानगी देण्यात आली आणि त्यांची खासदारकी वाचली. विक्रम सायनी नावाचे मुजफ्फर नगरचे भाजपचे खासदार त्यांच्यावर कारवाई झाली नाही, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले. हे जास्त दिवस नाही चालणार, सत्तेचा ज्याप्रमाणे गैरवापर करण्याचे काम भाजपने सुरू केले आहे, ते अधिक काळ चालत नाही. ही कायदेशीर लढाई आहे. सुनील केदार कायदेशीर लढाई लढतील, न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. Nana Patole On BJP
शिंदे गटाचे आमदार वॉशिंग मशीनमध्ये धुतलेले आहेत. अजित पवार गटातील लोक सुद्धा मशीनमध्ये धुतलेले आहेत. त्यांनी काहीही केले, अगदी त्यांनी लोकांना गोळ्या घातल्या तरी काही होणार नाही, त्यांना मोकळीक आहे, कारण ते वॉशिंग मशीनमध्ये धुतलेले आहेत. एकंदरीत महाराष्ट्रात भाजपने अराजकता माजवून ठेवली आहे. अधिकाऱ्यांना ज्याप्रमाणे सत्ता पक्षातील आमदार दम भरतात. त्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते.
हेही वाचा
फडणवीस यांनी लपाछपीचा खेळ थांबवावा : नाना पटोले
पंतप्रधानांना शेतकरी समजलाच नाही ; नाना पटोले यांची टीका
Congress : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शनिवारी राहुल गांधींना भेटणार
Latest Marathi News केदार यांची आमदारकी रद्द करण्याची भाजपला इतकी का घाई होती : नाना पटोले Brought to You By : Bharat Live News Media.
