Rise Up : ‘राईझ अप’ महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेचा आज समारोप

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : दै. ‘Bharat Live News Media’ आयोजित आणि पूना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने महिलांसाठी राईझ अप बॅडमिंटन स्पर्धेचा रविवार, दि 24 डिसेंबर रोजी समारोप होणार असून, पुणेकरांना हे सामने पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. जास्तीत जास्त पुणेकरांनी हे सामने पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन दै. ‘Bharat Live News Media’ च्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धा पूना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू आहेत. या स्पर्धेत नऊ, अकरा, तेरा, पंधरा, सतरा, एकोणीस आणि खुल्या गटातील महिला असे विविध 11 वयोगट सहभागी झालेले आहेत. स्पर्धेत एकूण 602 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून, प्रवेश मोफत ठेवण्यात आला होता. या सर्व वयोगटांच्या उपांत्य आणि अंतिम फेरी रविवार, दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार असून, पुणेकरांनी या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या राईझ अप सिझन 2 साठी माणिकचंद ऑक्सिरीच हे मुख्य प्रायोजक असून, सहप्रायोजक म्हणून रूपमंत्रा, मीडिया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, फायनान्स पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप. सोसायटी आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.
Latest Marathi News Rise Up : ‘राईझ अप’ महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेचा आज समारोप Brought to You By : Bharat Live News Media.
