Pune weather : एनडीए 11.5, शिवाजीनगर 12.5 अंशांवर

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : यंदाच्या हंगामात शनिवारी 23 रोजी शहराचा पारा दुसर्यांदा नीचांकी पातळीवर आला. एनडीए परिसराचा पारा 11.5, तर शिवाजीनगरचा 12.5 अंशांवर खाली आला. सायंकाळी पाचपासूनच शहरात गार वारे सुटले होते. डिसेंबर महिन्यात यंदा दुसर्यांदा शहराचा पारा 12 अंशांवर खाली आला. 16 डिसेंबर रोजी शहरात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्या दिवशी शिवाजीनगर 12.3, तर पाषाण, एनडीए, तळजाई परिसराचा पारा 11 अंशांवर खाली आला होता. त्यानंतर किमान तापमानात किंचित वाढ होऊन पारा 14.5 ते 15 अंशांवर गेला होता. 23 डिसेंबर रोजी पुन्हा शहराच्या तापमानात दोन ते अडीच अंशांची
घट झाली.
शहराचे शनिवारचे तापमान..
एनडीए 11.5, शिवाजीनगर 12.5, पाषाण 13.2, लोहगाव 14.2, चिंचवड 16.7, लवळे 19, कोरेगाव पार्क 16.7
Latest Marathi News Pune weather : एनडीए 11.5, शिवाजीनगर 12.5 अंशांवर Brought to You By : Bharat Live News Media.
