गाझामध्ये 24 तासांत 201 जण ठार! इस्रायलच्या पाच सैनिकांचाही मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : Israel Hamas War : गाझामध्ये हमासविरुद्ध इस्रायलची लष्करी कारवाई सुरूच आहे. इस्रायली सैन्याने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला आहे. हमास शासित गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, गेल्या 24 तासांत इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात 201 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे, मृतांची संख्या 20,258 वर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये मोठ्या … The post गाझामध्ये 24 तासांत 201 जण ठार! इस्रायलच्या पाच सैनिकांचाही मृत्यू appeared first on पुढारी.

गाझामध्ये 24 तासांत 201 जण ठार! इस्रायलच्या पाच सैनिकांचाही मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Israel Hamas War : गाझामध्ये हमासविरुद्ध इस्रायलची लष्करी कारवाई सुरूच आहे. इस्रायली सैन्याने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला आहे. हमास शासित गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, गेल्या 24 तासांत इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यात 201 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे, मृतांची संख्या 20,258 वर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे इस्रायलने शनिवारी आपल्या 5 सैनिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती दिली आहे. इस्रायलच्या लष्करी प्रमुखांच्या प्रवक्त्याने दावा केला आहे की त्यांच्या सैन्याने उत्तर गाझाचा मोठा भाग काबीज केला आहे आणि आता त्यांचे लक्ष दक्षिण गाझाकडे आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा एकदा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत स्वत: बायडेन यांनी याबाबत माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले म्हणाले की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी मी फोनवरून प्रदीर्घ चर्चा केली. ते आमच्यातील वैयक्तिक संभाषण होते.’ युद्धविरामाशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात बायडेन म्हणाले, ‘मी युद्धविराम करण्याविषयी कसलीच सूचना केलेली नाही.’ व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मानवतावादी सहाय्य कार्यांना पाठिंबा देणाऱ्यांसह नागरी लोकसंख्येचे संरक्षण करण्याच्या गरजेवर भर दिला. युद्धभूमीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.’ (Israel Hamas War)
व्हाईट हाऊसच्या निवेदनात म्हटले आहे की, बायडेन आणि नेतान्याहू यांनी इस्रायली लष्करी कारवाईच्या उद्देशावर चर्चा केली. उर्वरित सर्व ओलीसांची सुटका करण्यावरही भर दिला.’ त्याचवेळी नेतन्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, ‘युद्ध संपेपर्यंत त्यांचे लष्करी ऑपरेशन सुरूच राहील, असे आमच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.’
या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासने गाझा सीमा ओलांडून अचानक इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सुमारे 1,140 लोक मारले गेले. यानंतर इस्रायलने हमासचा नाश करण्याची शपथ घेतली आणि त्याविरोधात मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू केली.
Latest Marathi News गाझामध्ये 24 तासांत 201 जण ठार! इस्रायलच्या पाच सैनिकांचाही मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.