जम्मू काश्मीरमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला; निवृत्त पोलिस अधिकारी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या दोन दिवसांपासून भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. दरम्यान उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथे दहशतवाद्यांनी मशिदीवर हल्ला केला. या हल्ल्या दरम्यान दहशतवाद्यांनी निवृत्त पोलिस अधिकारी मोहम्मद शफी यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी हत्या झालेल्या परिसराला वेढा दिला आहे. (Terrorist Attack in Kashmir) मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त पोलीस … The post जम्मू काश्मीरमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला; निवृत्त पोलिस अधिकारी ठार appeared first on पुढारी.

जम्मू काश्मीरमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला; निवृत्त पोलिस अधिकारी ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: गेल्या दोन दिवसांपासून भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. दरम्यान उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथे दहशतवाद्यांनी मशिदीवर हल्ला केला. या हल्ल्या दरम्यान दहशतवाद्यांनी निवृत्त पोलिस अधिकारी मोहम्मद शफी यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी हत्या झालेल्या परिसराला वेढा दिला आहे. (Terrorist Attack in Kashmir)
मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त पोलीस अधिकारी मशिदीत अजान पठण करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच परिसरात शोधमोहिम सुरू असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून केलेल्या एका पोस्टमध्ये दिली आहे.  (Terrorist Attack in Kashmir)

Jammu & Kashmir | Terrorists fired upon Mohd Shafi, a retired police officer at Gantmulla, Sheeri Baramulla, while praying Azan in the mosque and succumbed to injuries. The area has been cordoned off. Further details awaited: J&K Police pic.twitter.com/c2U1D6oHTl
— ANI (@ANI) December 24, 2023

Terrorist Attack in Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये शोधमोहीम सुरूच
नुकताच जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर ताबडतोब सुरक्षा दलांनी राजौरीच्या जवळच्या थानामंडीसह घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली. मात्र, फरार दहशतवाद्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. शनिवारी दुपारी ढेरा की गली परिसरातील जंगलात गोळीबाराचा आवाज आला. यानंतर येथील नैसर्गिक गुहेची तपासणी करताना सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याचे सुरक्षा यंत्रणांनी नंतर स्पष्ट केले.
हेही वाचा:

Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद, हल्ल्यामागे PAFF चा हात
जम्मू-काश्मीरमध्‍ये चकमकीत 2 जवान शहीद
Article 370 verdict : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका सप्टेंबर २०२४ पर्यंत घ्या : सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निर्देश

Latest Marathi News जम्मू काश्मीरमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला; निवृत्त पोलिस अधिकारी ठार Brought to You By : Bharat Live News Media.