रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मुहूर्त १ मिनीट २४ सेकंदांचा
रामलल्ला प्रतिष्ठापना – ९
अयोध्या : वृत्तसंस्था : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचे सिंहासन तयार असून, त्यावर आता सोन्याचा मुलामा लावला जाईल. येत्या ९ दिवसांत राम मंदिराचा पहिला मजलाही तयार झालेला असेल. काशीच्या पंडितांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ निश्चित केली असून १ मिनीट २४ सेकंदांचा हा शुभ मुहूर्त आहे.
२२ जानेवारी रोजी मूळ मुहूर्त १२ वाजून २९ मिनिटे आणि ८ सेकंद झाल्यापासून सुरू होईल. तो १२ वाजून ३० मिनिटे आणि ३२ सेकंदांपर्यंत राहील. म्हणजेच एकूण १ मिनीट २४ सेकंद हा प्राण प्रतिष्ठेसाठीचा मुहूर्त असेल, असे पंडित गणेशेश्वर शास्त्री द्रवीड आणि पंडित विश्वेश्वर शास्त्री द्रवीड यांनी सांगितले. मुहूर्ताचे शुद्धीकरणही केले जाणार आहे. मुहूर्त शुद्धीची वेळ २० मिनिटे असेल. १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजलेपासून ती सुरू होईल आणि ६ वाजून २० मिनिटांपर्यंत असेल. यानंतर २० जानेवारीला सूर्योदयापूर्वी मुहूर्तावर शुद्धीकरणाचा संकल्प केला जाईल.
२९ रोजी मूर्तीची निवड रामलल्लाच्या एकूण ३ मूर्ती तयार झाल्या आहेत. एक काळ्या रंगाची, दुसरी गडद काळ्या शाळिग्राम दगडाची आणि तिसरी पांढऱ्या दगडाची मूर्ती आहे. यापैकी एकीची निवड ७ जानेवारीपूर्वी होईल. बहुदा २९ डिसेंबर रोजी मूर्तीची निवड झालेली असेल, असे सांगण्यात येते. तिची प्राणप्रतिष्ठा गर्भगृहात होईल. गर्भगृहातून बाहेर पडताच समोर गणपती आणि मारुतीच्या मूर्ती असतील.
आकडे बोलतात…
१० प्रवतार मंदिरातील स्तंभांवर.
६४ योगिनींची रुपेही साकारली.
५२ शक्तिपीठांचे दर्शन घडेल.
१२ रूपे सुर्याची कोरलेली आहेत.
१६ शिल्पे प्रत्येक खांबावर.
Latest Marathi News रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मुहूर्त १ मिनीट २४ सेकंदांचा Brought to You By : Bharat Live News Media.