छत्तीसगडमध्ये नक्षलवादी- सुरक्षा दलामध्ये चकमक; ४ नक्षलवादी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडच्या सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. दरम्यान, नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत ३ ते ४ नक्षलवादी मारले गेले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. (Chhattisgarh Encounter) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्यांतील जिल्हा राखीव गट (DRG) आणि CRPF ची २ … The post छत्तीसगडमध्ये नक्षलवादी- सुरक्षा दलामध्ये चकमक; ४ नक्षलवादी ठार appeared first on पुढारी.

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी- सुरक्षा दलामध्ये चकमक; ४ नक्षलवादी ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडच्या सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. दरम्यान, नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत ३ ते ४ नक्षलवादी मारले गेले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. (Chhattisgarh Encounter)
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्यांतील जिल्हा राखीव गट (DRG) आणि CRPF ची २ री आणि १११ वी बटालियन तुकड्यांचे सयुक्त पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. दरम्यान, गोगुंडा या भागात नियमित गस्त आणि शोध मोहीम राबवत असताना त्यांची नजर नक्षलवाद्यांवर पडली आणि यावेळी चकमक उडाली. (Chhattisgarh Encounter)

Fierce firefight underway between forces and Naxalites in Chhattisgarh’s Sukma, at least 3-4 ultras gunned down: Officials
Read @ANI Story | https://t.co/4wulqnqGoq#Chattisgarh #Sukma pic.twitter.com/blwXgFJXd1
— ANI Digital (@ani_digital) December 23, 2023

सुकमाचे एसपी किरण चव्हाण आणि सीआरपीएफचे डीआयजी अरविंद राय यांनी सांगितले की, ते अजूनही सुरू असलेल्या चकमकीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच चकमक झालेल्या परिसरात सुरक्षा दलाकडून अजूनही शोधमोहीम सुरू आहे, असेही एएनआयने सविस्तरपणे दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
Chhattisgarh Encounter:  मुख्यमंत्री विष्णू देव साय आज पंतप्रधानांच्या भेटीला
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी आज उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि अरुण साओ यांच्यासह दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. दरम्यान छत्तीसगडचे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला गेले असता राज्यात मात्र मोठी चकमक घडून आली आहे. (Chhattisgarh Encounter)
हेही वाचा:

PM Modi : भाजपचे टार्गेट ठरलं: लोकसभेसाठी ३०३+ जागा जिंकण्याचे पीएम मोदींचे कार्यकर्त्यांना आवाहन
Sandeep Maheshwari-Vivek Bindra : दोन मोठ्या मोटिव्हेशनल स्पीकर्समध्ये जुंपली, नेमकं काय घडलं?
तापमान वाढ रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : चंद्रकांत इंदलकर

The post छत्तीसगडमध्ये नक्षलवादी- सुरक्षा दलामध्ये चकमक; ४ नक्षलवादी ठार appeared first on Bharat Live News Media.

Go to Source