संसद सुरक्षा भंग प्रकरण; संशयित आरोपी महेश कुमावतच्या कोठडीत वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच, बुधावारी १३ डिसेंबर रोजी काही तरूणांनी सभागृहात घुसखोरी केली. याचवेळी काही तरूणांनी संसद परिसरात देखील धुराच्या नळकांड्या फोडत, सरकारविरोधी घोषणाबाजी केली. या संसद सुरक्षा भंग प्रकरणात ५ संशयित तरूणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामधील महेश कुमावत या तरूणांच्या कोठडीत वाढ करण्यात आली … The post संसद सुरक्षा भंग प्रकरण; संशयित आरोपी महेश कुमावतच्या कोठडीत वाढ appeared first on पुढारी.

संसद सुरक्षा भंग प्रकरण; संशयित आरोपी महेश कुमावतच्या कोठडीत वाढ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच, बुधावारी १३ डिसेंबर रोजी काही तरूणांनी सभागृहात घुसखोरी केली. याचवेळी काही तरूणांनी संसद परिसरात देखील धुराच्या नळकांड्या फोडत, सरकारविरोधी घोषणाबाजी केली. या संसद सुरक्षा भंग प्रकरणात ५ संशयित तरूणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामधील महेश कुमावत या तरूणांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. (Parliament Security Breach Case)
संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी संशयित आरोपी आरोपी महेश कुमावत याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज (दि.२३) त्याला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान महेश याच्या पोलिस कोठडीत पुढील १३ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी ५ जानेवारी पर्यंत महेश कुमावत याच्या कोठडीत वाढ झाली आहे. (Parliament Security Breach Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशचे इतर संसद भंग प्रकरणातील इतर आरोपींसोबत गेल्या २ वर्षांपासून संबंध होते. महेश या कटाचा भाग होता. सर्व आरोपींमध्ये झालेल्या जवळपास सर्व बैठकांना तो उपस्थित राहिला होता. तसेच मुख्य आरोपी ललित झा याच्यासोबत मोबाईल फोन आणि पुरावे नष्ट करण्याच्या कृत्यातही त्याचा सक्रिय सहभाग होता. (Parliament Security Breach Case)

#WATCH दिल्ली: संसद सुरक्षा चूक मामले में गिरफ्तार आरोपी महेश कुमावत को दिल्ली पटियाला हाउस कोर्ट में लाया गया। pic.twitter.com/Qer0sLX2cj
— ANI_HindiNews (@AHindinews) December 23, 2023

हेही वाचा:

Sunil Kedar : कारागृहात रवानगी होताच सुनील केदारांची तब्येत बिघडली; रूग्णालयात दाखल
France | ३०३ भारतीयांच्या मानवी तस्करीचा संशय, विमान फ्रान्सच्या ताब्यात, काय आहे प्रकरण?
Manoj Jarange Patil : भुजबळ खालच्या विचारांचे त्यांच्या मनात मराठ्यांविषयी विष : जरांगे

The post संसद सुरक्षा भंग प्रकरण; संशयित आरोपी महेश कुमावतच्या कोठडीत वाढ appeared first on Bharat Live News Media.

Go to Source