सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ओझरच्या विघ्नहर चरणी नतमस्तक
ओतूर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अष्टविनायकापैकी एक असलेल्या ओझर (ता. जुन्नर) येथील विघ्नहर चरणी नतमस्तक होत सपत्नीक दर्शन घेतले.
यावेळी विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या वतीने देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे व ओझरच्या सरपंच राजश्री कवडे यांनी वळसे पाटील यांचे विघ्नहर श्री गणेशाची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले.
ऐन भाऊबीजेच्या दिवशी विघ्नहराच्या दर्शनाला सपत्नीक हजेरी लावण्यामागे राज्यातील होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका व शिरूर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमी असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. शिरूर लोकसभा निवडणूक रिंगणात ते स्वतः उतरणार असल्याची चर्चा राष्ट्रवादी पक्षाच्या गोटात जोर धरू लागली आहे.
याप्रसंगी किरणताई वळसे पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, शेतकरी संघटनेचे तानाजी बेनके, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते गुलाब नेहरकर, विनायक तांबे, ओझरच्या सरपंच राजश्री कवडे तसेच देवस्थानचे सर्व विश्वस्त, ग्रामपंचायत सदस्य, जुन्नर तालुक्यातील गावोगावचे राष्ट्रवादी पक्षाचे कार्ययकर्ते, ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :
मेट्रो आजपासून नवी मुंबईकरांच्या सेवेत; मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर मार्गावर धावणार
Nashik Crime : तरुणीने लग्नाला नकार दिल्याने सात वाहनांची जाळपोळ
The post सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ओझरच्या विघ्नहर चरणी नतमस्तक appeared first on पुढारी.
ओतूर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अष्टविनायकापैकी एक असलेल्या ओझर (ता. जुन्नर) येथील विघ्नहर चरणी नतमस्तक होत सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या वतीने देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे व ओझरच्या सरपंच राजश्री कवडे यांनी वळसे पाटील यांचे विघ्नहर …
The post सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ओझरच्या विघ्नहर चरणी नतमस्तक appeared first on पुढारी.