बाळसाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन
मुंबई पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांसह ठाकरे गटाचे नेते आज (शुक्रवारी) शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर दाखल होणार आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी अनंतात विलीन झाले. स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या दरवर्षी शिवसैनिकांसह विविध क्षेत्रांतील त्यांचे चाहते शिवाजी पार्क येथे आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सर्व मंडळी आदरांजली वाहण्यासाठी सकाळीच शिवाजी पार्कवर दाखल होणार आहेत.
स्मृतिस्थळावर वाद नको, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना मागच्या वर्षी एक दिवस आधीच म्हणजे १६ नोव्हेंबर रोजीच शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाला भेट देत आदरांजली वाहिली होती. मात्र, शिंदे आणि त्यांचे सहकारी तिथून निघून जाताच स्मृतिस्थळावर गोमूत्र शिंपडण्याचा प्रकार ठाकरे गटाने केला होता.
The post बाळसाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन appeared first on पुढारी.
मुंबई पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांसह ठाकरे गटाचे नेते आज (शुक्रवारी) शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर दाखल होणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी अनंतात विलीन झाले. स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या दरवर्षी शिवसैनिकांसह विविध क्षेत्रांतील त्यांचे चाहते शिवाजी पार्क येथे आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. पक्षप्रमुख उद्धव …
The post बाळसाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन appeared first on पुढारी.