बजरंग पुनिया ‘पद्मशी’ परत करणार, PM मोदींना लिहिले पत्र
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Bajrang Punia Returns Padmashri : भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या निवडीवर नाराज होत महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने थेट निवृत्ती जाहीर केली. आता या प्रकरणी बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे.
पुनिया काय म्हणाला? (Bajrang Punia Returns Padmashri)
पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा करताना पुनियाने एक्सवर एक निवेदन पोस्ट केले आहे, ‘मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे. मी माझे म्हणणे या पत्राद्वारे मांडत आहे. हे माझे अधिकृत विधान देखील आहे.’
त्याने पुढे म्हटलंय की, ‘आम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जायचो तेंव्हा स्टेज डायरेक्टर आम्हांला पद्मश्री, खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेते पैलवान म्हणवून ओळख करून द्यायचे आणि लोक मोठ्या उत्साहात टाळ्या वाजवायचे. आता असे कोणी केले तर मला तिरस्कार वाटेल.’
मैं अपना पद्मश्री पुरस्कार प्रधानमंत्री जी को वापस लौटा रहा हूँ. कहने के लिए बस मेरा यह पत्र है. यही मेरी स्टेटमेंट है। 🙏🏽 pic.twitter.com/PYfA9KhUg9
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) December 22, 2023
एका अल्पवयीन कुस्तीपटूसह 7 महिला कुस्तीपटूंनी WFI चे माजी अध्यक्ष ब्रिज भूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. याबाबत पैलवानांनी जोरदार निदर्शने केली. पुनियाही त्या आंदोलनाचा एक भाग होता.
साक्षी मलिकची निवृत्ती
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक हिने वयाच्या 31 व्या वर्षी कुस्तीतून निवृत्ती घेतली. गुरुवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. ब्रिजभुषण सिंह यांचा सहकारी कुस्ती महासंघात अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने तिने हा निर्णय घेतला. तर या निवडणुकीच्या निर्णयाचा निषेध करत साक्षी मलिकने ही निवृत्तीची घोषणा जाहीर केली आहे.
साक्षी मलिकने बर्मिंगहॅम येथे 2022 च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये शेवटची स्पर्धा खेळली होती, जिथे भारतीय कुस्तीपटूने महिलांच्या 62 किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. मात्र त्यानंतर तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला नाही. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी तिने 2009 आशियाई ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 59 किलो फ्रीस्टाइलमध्ये रौप्य पदक जिंकले होते.
The post बजरंग पुनिया ‘पद्मशी’ परत करणार, PM मोदींना लिहिले पत्र appeared first on Bharat Live News Media.