Pune : समाविष्ट गावांना करसवलतीची 31 जानेवारीपर्यंत मुदत
पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील मिळकतींना मिळकत कराची बिले वाटण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या गावांमधील निवासी मिळकतींना करामध्ये 40 टक्के सवलत मिळविण्यासाठी पीटी 3 अर्ज भरण्याची मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. महापालिकेने समाविष्ट गावांतील मिळकतींच्या नोंदी करण्यास सुरुवात केली आहे. हे काम 80 टक्क्यांच्या पुढे गेले असून ग्रामपंचायतीकडे असलेल्या नोंदीनुसार मिळकतींवर करआकारणी केली जात आहे. मात्र, मांजरी, वाघोरी, सुस-म्हाळुंगे, बावधन आदी मोठ्या गावांमधील नोंदी करण्यास वेळ लागत आहे. मिळकतींवर करआकारणी करण्यासाठी प्रत्येक मिळकत शोधून, त्यावर नोटीस चिटकवून सुनावणी घेतली जाते. त्यानंतर करआकारणी केली जाते. ज्या गावांत मिळकतींची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी हे काम 90 टक्क्यांच्या पुढे गेले आहे.
जुन्या हद्दीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंतच मुदत
समाविष्ट 23 गावे वगळता शहराच्या जुन्या हद्दीतील मिळकतींना 40 टक्के सवलत मिळविण्यासाठी पीटी3 अर्ज भरून देण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. ती मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे.
हेही वाचा :
हुडहुडी वाढली ! राज्यातील किमान तापमानात 4 ते 6 अंशांनी घट
24 डिसेंबरला आपला विजय होणारच; मनोज जरांगे यांचा विश्वास
The post Pune : समाविष्ट गावांना करसवलतीची 31 जानेवारीपर्यंत मुदत appeared first on पुढारी.
पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील मिळकतींना मिळकत कराची बिले वाटण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या गावांमधील निवासी मिळकतींना करामध्ये 40 टक्के सवलत मिळविण्यासाठी पीटी 3 अर्ज भरण्याची मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. महापालिकेने समाविष्ट गावांतील मिळकतींच्या नोंदी करण्यास सुरुवात केली आहे. हे काम 80 …
The post Pune : समाविष्ट गावांना करसवलतीची 31 जानेवारीपर्यंत मुदत appeared first on पुढारी.