दररोजच्या बाजारभावाने नाफेडमार्फत तुरीची खरेदी

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  नाफेडच्या पीएसएफ योजनेंतर्गत पणन महासंघाच्या संस्थांकडून खरेदी करण्यासाठी नगर जिल्ह्यासाठी पाथर्डीची जय भगवान स्वंयरोजजगार सहकारी संस्था व मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील जय किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था या दोन केंद्रांना परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे यावर्षी सरकार प्रथमच हमी भावात नव्हे, तर दररोज निघणार्‍या बाजारभावानुसार तूर खरेदी करणार असल्याची माहिती … The post दररोजच्या बाजारभावाने नाफेडमार्फत तुरीची खरेदी appeared first on पुढारी.

दररोजच्या बाजारभावाने नाफेडमार्फत तुरीची खरेदी

पाथर्डी तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा :  नाफेडच्या पीएसएफ योजनेंतर्गत पणन महासंघाच्या संस्थांकडून खरेदी करण्यासाठी नगर जिल्ह्यासाठी पाथर्डीची जय भगवान स्वंयरोजजगार सहकारी संस्था व मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील जय किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था या दोन केंद्रांना परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे यावर्षी सरकार प्रथमच हमी भावात नव्हे, तर दररोज निघणार्‍या बाजारभावानुसार तूर खरेदी करणार असल्याची माहिती नगर जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्रीकांत आभाळे यांनी दिली.
आभाळे म्हणाले, नाफेड अंतर्गत तूर खरेदीसाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांची हमी भावाने तूर खरेदीसाठी जय भगवान स्वंयरोजगार सहकारी संस्थेला पाथर्डी, शेवगाव व नेवासा तालुक्यांतील तूर खरेदीसाठी परवानगी देण्यात आली. शेतकर्‍यांची नावे नोंदणी करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
खरिपातील भरडधान्याचे बाजारभाव हमी भावापेक्षा जास्त असल्याने ज्वारी, मका आणि बाजरीच्या शासकीय खरेदीकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरवली होती. सरकारने आता दररोज निघणार्‍या बाजारभावाने तूर खरेदीचा निर्णय घेतला. यामुळे शेतकर्‍यांना लाभ होईल आणि व्यापार्‍यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन शेतकर्‍यांना फायदा होईल. तूर पिकाचा हमीभाव सरकारने 7 हजार रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला आहे. मात्र, सध्या बाजारात तूर 8 हजार 500 रुपयांपेक्षा जास्त भावाने खरेदी केली जात आहे.
कागदपत्रांबाबत शेतकर्‍यांना आवाहन
शेतकर्‍यांची खरेदीसाठी नोंद झाली असेल, तर त्याने इतर कागदपत्रे देण्याऐवजी फक्त पीकपेरा असलेला सातबारा उतारा जोडावा लागणार आहे. नवीन शेतकर्‍यांना मात्र आधार कार्ड, अचूक बँक खाते आणि ऑनलाईन पीक पेरा असलेला उतारा जोडणे आवश्यक असेल, असे अवाहन जय भगवान स्वयं रोजगार सहकारी संस्थेने केले आहे.
यावर्षी प्रथमच नाफेड दररोज तुरीचा बाजारभाव सकाळीच खरेदी केंद्रांना कळवेल. त्याच दराने तूर खरेदी केली जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी नोंद करून या योजनेचा लाभ घ्यावा.
                                              – श्रीकांत आभाळे,  जिल्हा मार्केटिंग अधिकारी
The post दररोजच्या बाजारभावाने नाफेडमार्फत तुरीची खरेदी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source