शहराच्या मुख्य चौकात एस टीचे ब्रेक निकामी होतात तेव्हा…

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : भरधाव एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने समोरील चार वाहनांना जोरात धडक बसली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले. जेजुरीतील पुणे-पंढरपूर महामार्गावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात गुरुवारी (दि. 21) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मंगळवेढा आगाराची मंगळवेढा-पुणे (एमएच 06 एस 8316) … The post शहराच्या मुख्य चौकात एस टीचे ब्रेक निकामी होतात तेव्हा… appeared first on पुढारी.

शहराच्या मुख्य चौकात एस टीचे ब्रेक निकामी होतात तेव्हा…

जेजुरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : भरधाव एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने समोरील चार वाहनांना जोरात धडक बसली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले. जेजुरीतील पुणे-पंढरपूर महामार्गावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात गुरुवारी (दि. 21) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मंगळवेढा आगाराची मंगळवेढा-पुणे (एमएच 06 एस 8316) ही बस पुण्याकडे जात होती. दुपारी 4 वाजता बस जेजुरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकामध्ये आली असता अचानक तिचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला. भरधाव बसने समोर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरला (एमएच 11 ए 3316) जोरदार धडक दिली.
टँकरची देखील पुढे असलेल्या कारला (एमएच 12 एलवी 2288) आणि या कारची तिच्या पुढील कारला (एमएच 12 जीएफ 6876) धडक बसली. अखेरीस ही पुढील ट्रकखाली घुसली. या अपघातात बससह इतर तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी जेजुरीचा आठवडे बाजार असल्याने मोठी गर्दी होती. त्याचबरोबर पालखी महामार्गावरही वाहनांच्या रांगांच्या रांगा लागलेल्या होत्या. अशातच हा अपघात झाल्याने मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर या चौकात बंदोबस्तासाठी असणार्‍या सहायक फौजदार उदय पवार, शिवाजी काटे व इतर पोलिस कर्मचार्‍यांनी त्वरित ही वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू केली.
हेही वाचा :

सावधान ! मोबाईलमुळे मुलांना लागतेय गेमिंग डिसऑर्डरचे व्यसन
Manish Sisodia news : दिल्ली उत्पादन शुल्क धोरण: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाही; न्यायालयीन कोठडीत वाढ

The post शहराच्या मुख्य चौकात एस टीचे ब्रेक निकामी होतात तेव्हा… appeared first on Bharat Live News Media.

Go to Source