पाण्याखाली 375 वर्षांपूर्वीचे शहर की नैसर्गिक रचना?

अथेन्स : ग्रीसमध्ये पाण्याखालील शहर सापडल्याचा दावा करण्यात येत होता. हे शहर 375 वर्षे जुने असल्याचे मानले जात होते. हा शोध ग्रीसमधील झाकिन्थॉस येथे समुद्रतळाशी लागला; मात्र हे शहराचे अवशेष नसून, ती नैसर्गिकरत्ीया तयार झालेली रचना असल्याचे आता संशोधकांनी म्हटले आहे. तज्ज्ञांना अटलांटिक महासागराच्या मध्यभागी एक बेपत्ता झालेला खंड सापडल्याची माहिती मिळाली होती, जो 375 … The post पाण्याखाली 375 वर्षांपूर्वीचे शहर की नैसर्गिक रचना? appeared first on पुढारी.

पाण्याखाली 375 वर्षांपूर्वीचे शहर की नैसर्गिक रचना?

अथेन्स : ग्रीसमध्ये पाण्याखालील शहर सापडल्याचा दावा करण्यात येत होता. हे शहर 375 वर्षे जुने असल्याचे मानले जात होते. हा शोध ग्रीसमधील झाकिन्थॉस येथे समुद्रतळाशी लागला; मात्र हे शहराचे अवशेष नसून, ती नैसर्गिकरत्ीया तयार झालेली रचना असल्याचे आता संशोधकांनी म्हटले आहे. तज्ज्ञांना अटलांटिक महासागराच्या मध्यभागी एक बेपत्ता झालेला खंड सापडल्याची माहिती मिळाली होती, जो 375 वर्षांपासून बेपत्ता होता. 2013 मध्ये झाकिन्थॉसच्या किनार्‍यावर रहस्यमय अवशेष सापडले होते, तेव्हा पाण्याखालील हे ‘शहर’ सापडले. आयोनियन बेटांतील हा तिसरा सर्वात मोठा समुद्रकिनारा आहे.
त्याचे नाव ग्रीक पौराणिक कथेवरून ठेवले आहे. इंडिपेंडेंट यूकेच्या अहवालानुसार, झाकिन्थॉसमधील एलिकानासच्या खाडी परिसरात काही अवशेष सापडले होते, जे 30 एकरांपेक्षा अधिक जागेत पसरले होते. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून दोन ते सहा मीटर खोलवर होते. यामध्ये दगडांनी तयार केलेले ‘पदपथ’ आणि मध्यभागी मोठा गोल आकार असलेला 20 खांबांचा पाया दिसत आहे. दगडाचे हे मोठे स्लॅब प्राचीन सार्वजनिक इमारतींच्या मजल्यांसारखे दिसत होते. ते पाहून पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी ते एखाद्या बंदराचा किंवा एखाद्या प्राचीन इमारतीचा भाग असल्याचा अंदाज लावला; मात्र आता यामागचे गूढ उकलले आहे. पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन नमुने गोळा केले आहेत.
यातून त्यांना जी माहिती मिळाली ते पाहून शास्त्रज्ञांचा हिरमोड झाला, कारण हे पाण्याखालील अवशेष कुठल्या रहस्यमयी शहराचे नसून उलट हे अवशेष 5 हजार वर्षांपूर्वी नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या काँक्रिटचे आहेत. शोधाचे परिणाम समोर आल्यानंतरही बेटावर राहणारे स्थानिक लोक हे अवशेष नैसर्गिकरीत्या तयार झाले आहेत, यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. जुन्या कागदपत्रांवरून असे दिसून येते की, एकेकाळी एलीकानासच्या आखातात काहीतरी होते, असे ते सांगतात.
The post पाण्याखाली 375 वर्षांपूर्वीचे शहर की नैसर्गिक रचना? appeared first on Bharat Live News Media.

Go to Source