
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आम्ही देशातील १४० कोटी लोकांसाठी लढू, संसद आणि संसदीय प्रतिष्ठेसाठी लढू, संविधानासाठी लढू, असे काँग्रेसचे नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी म्हटले आहे. ते दिल्लीतील जंतरमंतरवर आयोजित आंदोलनादरम्यान बोलत होते. संसदेतील निलंबित खासदार आणि सरकारच्या धोरणाविरूद्ध विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीकडून जतंरमंतरवर आंदोलन आणि निदर्शने सुरू आहे. यावेळी अनेक नेत्यांनी आपले मत मांडले. (Opposition MPs at Jantar Mantar)
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान १४६ सदस्यांच्या निलंबनाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या प्रमुखांकडून शुक्रवारपासून (दि.२२) देशव्यापी निदर्शने करण्यात येत आहेत. दिल्लीतील जंतरमंतर येथे या आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली. विरोधकांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन ‘लोकशाही वाचवण्यासाठी’ करण्यात येत आहे. (Opposition MPs at Jantar Mantar)
VIDEO | “We will fight for 140 crore people, fight for Parliament and parliamentary dignity, fight for the Constitution,” says Congress leader @rssurjewala during Opposition’s protest at Delhi’s Jantar Mantar. pic.twitter.com/0LwWp7se6H
— Press Trust of India (@PTI_News) December 22, 2023
आमची फक्त निवेदनाची मागणी- खासदार दिग्विजय सिंह
आतापर्यंत एवढ्या खासदारांना कधी निलंबित करण्यात आले आहे का? आम्ही फक्त गृहमंत्र्यांकडे निवेदनाची मागणी केली होती, असे मत काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे.
संसद सुरक्षा भंग घटनेसाठी भाजप जबाबदार- सीताराम येचुरी
“सध्या सत्तेत असलेल्यांपासून आपल्याला लोकशाही वाचवायची आहे. संसदेत सुरक्षा भंगाच्या घटनेसाठी भाजपला जबाबदार धरले पाहिजे,” असे मत सीपीआय (एम) नेते सीताराम येचुरी दिल्लीच्या जंतरमंतरवर विरोधी पक्षांच्या आंदोलनादरम्यान व्यक्त केले.
VIDEO | “We need to save the democracy from those who are currently in power. The BJP must be held accountable for security breach incident in the Parliament,” says CPI(M) leader @SitaramYechury during Opposition Parties’ protest in Delhi’s Jantar Mantar. pic.twitter.com/9B0VjY3RGc
— Press Trust of India (@PTI_News) December 22, 2023
हेही वाचा:
Amol Kolhe on Terrorism: बतावण्या करणाऱ्या केंद्र सरकारने “दहशतवाद” गांभीर्याने घ्यावा- खासदार अमोल कोल्हे
Parliament breach : संसद सुरक्षा भंग प्रकरण; आरोपी ललित झा याच्या कोठडीत वाढ
Sanjay Raut : पुंछ हल्ला मिनी पुलवामा हल्ला,सरकार कोणता उत्सव साजरा करतंय : संजय राऊत
The post “आम्ही लढू”; जंतरमंतरवर इंडिया आघाडीतील विरोधी पक्ष एकत्र appeared first on Bharat Live News Media.
