Pune : मेडदमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; रात्रीत तीन दुकाने फोडली

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामती शहरानजीक मेडद येथे शुक्रवारी (दि. 15) चोरट्यांनी एका रात्रीत तीन दुकाने फोडली. या घटनेत सुमारे 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. या चोर्यांमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी माधव श्रीहरी झगडे (रा. मेडद, ता. बारामती) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शनिवारी (दि. 17) झगडे यांनी त्यांचा गाळा क्रमांक 1 मधील आईस्क्रीम पार्लर उघडले असता गल्ल्यातील 4 हजार 200 रुपयांची रोकड त्यांना दिसून आली नाही. तसेच आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, स्टेशनरी वरही चोरट्यांनी डल्ला मारला. या घटनेत त्यांच्या दुकानातून एकूण 26 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले.
त्यांच्या शेजारील गाळा क्रमांक 2 मध्ये मुशरफ शकूर जहागीरदार (रा. पतंगशहानगर, बारामती) यांचे हसन एंटरप्रायजेस हे दुकान फोडत चोरट्यांनी तेथून 4 हजार 500 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. गाळा क्रमांक 3 मधील शिवाजी जठार (रा. खंडोबानगर, बारामती) यांचे दुकान फोडत तेथून 4 हजार 200 रुपयांची रोख रक्कम चोरण्यात आली. या तिन्ही चोर्या गाळ्याच्या पाठीमागील बाजूचे पत्रे उचकटून करण्यात आल्या. माळेगाव पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल केले.
The post Pune : मेडदमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; रात्रीत तीन दुकाने फोडली appeared first on Bharat Live News Media.

Home ठळक बातम्या Pune : मेडदमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; रात्रीत तीन दुकाने फोडली
Pune : मेडदमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; रात्रीत तीन दुकाने फोडली
बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरानजीक मेडद येथे शुक्रवारी (दि. 15) चोरट्यांनी एका रात्रीत तीन दुकाने फोडली. या घटनेत सुमारे 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. या चोर्यांमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी माधव श्रीहरी झगडे (रा. मेडद, ता. बारामती) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शनिवारी (दि. 17) झगडे यांनी त्यांचा …
The post Pune : मेडदमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; रात्रीत तीन दुकाने फोडली appeared first on पुढारी.
