पाच तासांनी बछडे आईच्या कुशीत

पारगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिंगवे (ता. आंबेगाव) येथील गोरडे मळ्यातील झुंबर किसन गोरडे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना आढळून आलेले बिबट बछडे पाच तासांनी मादीच्या कुशीत पुन्हा विसावले. मादी तीनही बछड्यांना एकामागून एक अलगदपणे घेऊन गेली. हे दृश्य ट्रॅप कॅमेर्यात कैद झाले आहे. गुरुवारी (दि . 21) सकाळी 10 च्या सुमारास ऊसतोडणी कामगारांना तीन बिबट बछडे ऊसतोडणी शेतात आढळून आले होते. वन विभागाने हे तीनही बछडे ताब्यात घेऊन पुन्हा मादीच्या स्वाधीन करण्यासाठी त्याच शेतात ठेवले होते. दुपारी 12 वाजता बिबट बछडे क्रेटमध्ये ठेवले होते. त्यावर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवूनच होते. साडेबाराच्या दरम्यान मादी बछड्यांना घेऊन जाण्यासाठी तेथे आली. परंतु आजूबाजूच्या शेतांमध्ये कांदालागवडींची कामे सुरू असल्याने आवाजामुळे ती पुन्हा माघारी निघून गेली. त्यानंतर सायंकाळी पाच ते सव्वा सहाच्या दरम्यान मादीने एकामागून एक बछड्यांना सुरक्षितस्थळी तेथून हलवले. या मोहिमेत वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक बालाजी पोतरे, शरद जाधव, रेस्क्यू पथकाचे सदस्य दत्तात्रय राजगुरव, शारदा राजगुरव यांनी सहकार्य केले.
हेही वाचा :
Nashik Accident : भरधाव वाहने ठरताहेत जीवनाची काळरात्र
Aditya Thackeray on government : आपला देश हुकूमशाहीकडे, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
The post पाच तासांनी बछडे आईच्या कुशीत appeared first on Bharat Live News Media.
