Nashik Accident : भरधाव वाहने ठरताहेत जीवनाची काळरात्र

शहरात जानेवारी ते नोव्हेंबर अखेरपर्यंत ४२६ अपघातांची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. त्यात १७१ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३२२ जण गंभीर जखमी, १०० किरकोळ जखमी झाले आहेत. यातील ५० टक्के अपघात हे सायंकाळी 4 ते मध्यरात्री १२ या कालावधीत झाले आहेत. त्यामुळे सायंकाळनंतर वेगावर स्वार होत मृत्यू धावत असल्याचे वास्तव दिसत आहे. शहरातून … The post Nashik Accident : भरधाव वाहने ठरताहेत जीवनाची काळरात्र appeared first on पुढारी.

Nashik Accident : भरधाव वाहने ठरताहेत जीवनाची काळरात्र

नाशिक : गौरव अहिरे

शहरात जानेवारी ते नोव्हेंबर अखेरपर्यंत ४२६ अपघातांची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. त्यात १७१ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३२२ जण गंभीर जखमी, १०० किरकोळ जखमी झाले आहेत. यातील ५० टक्के अपघात हे सायंकाळी 4 ते मध्यरात्री १२ या कालावधीत झाले आहेत. त्यामुळे सायंकाळनंतर वेगावर स्वार होत मृत्यू धावत असल्याचे वास्तव दिसत आहे.
शहरातून नाशिक- पुणे, मुंबई- आग्रा व त्र्यंबक-नाशिक- पेठ असे तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. तर राज्य महामार्ग आणि इतर रस्तेही आहेत. दाखल गुन्ह्यांनुसार राष्ट्रीय महामार्गांवर १५९, राज्य महामार्गावर आठ व इतर रस्त्यांवर सर्वाधिक २५९ अपघात झाले आहेत. त्यात मध्यरात्री १२ ते पहाटे 4 या वेळेत सर्वात कमी ३५, पहाटे 4 ते सकाळी 8 या वेळेत ४०, सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत ७५, दुपारी १२ ते 4 या वेळेत १०४ आणि रात्री ८ ते मध्यरात्री १२ या वेळेत १०७ अपघातांची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्वाधिक अपघात शहरातील कॉलनी रोड, रिंग रोड व महत्त्वाच्या मार्गांवर झाले आहेत.
अपघात व अपघाती मृत्यूंची कारणे
-वेगाने वाहने चालवणे
-वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे
-रस्त्यांवर व रस्त्यांलगत असलेले अतिक्रमण
-सुरक्षिततेसाठी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणे
-रस्त्यांवरील खड्डे, माती असणे

रस्ते
०० ते ०४
०४ ते ०८
०८ ते १२
१२ ते १६
१६ ते २०
२० ते २४

राष्ट्रीय महामार्ग
16
16
31
24
34
38

राज्य महामार्ग
00
02
01
00
03
02

इतर रस्ते
19
22
43
41
67
67

हेही वाचा :

शाळेला किलबिलाटाची प्रतीक्षा; धानोरीतील इमारत दोन वर्षांपासून वापराविना
Reading party : वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ‘रीडिंग पार्टी’चा ट्रेंड
Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टीची तेजी कायम, ‘हे’ शेअर्स चमकले

The post Nashik Accident : भरधाव वाहने ठरताहेत जीवनाची काळरात्र appeared first on Bharat Live News Media.

Go to Source