शब्द त्यांचाच, त्यांनी २४ डिसेंबरच्या आत पूर्ण करावा- मनोज जरांगे पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : शब्द त्यांच्या तज्ज्ञांनी दिला आम्ही नाही दिला. तुमच्याच शब्दावर तुम्ही अजून टाइम बाऊंड दिला नाही. त्यामुळे शब्द त्यांचाच (सरकारचा) असून त्यामुळे त्यांनी २४ डिसेंबरच्या आत पूर्ण करावा, असा इशारा मनोज जरांगे- पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. ते आज (दि.१२) परभणीमधील सेलून येथून पत्रकार परिषदेत बोलत होते. (Maratha Reservation) Maratha Reservation: … The post शब्द त्यांचाच, त्यांनी २४ डिसेंबरच्या आत पूर्ण करावा- मनोज जरांगे पाटील appeared first on पुढारी.

शब्द त्यांचाच, त्यांनी २४ डिसेंबरच्या आत पूर्ण करावा- मनोज जरांगे पाटील

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : शब्द त्यांच्या तज्ज्ञांनी दिला आम्ही नाही दिला. तुमच्याच शब्दावर तुम्ही अजून टाइम बाऊंड दिला नाही. त्यामुळे शब्द त्यांचाच (सरकारचा) असून त्यामुळे त्यांनी २४ डिसेंबरच्या आत पूर्ण करावा, असा इशारा मनोज जरांगे- पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. ते आज (दि.१२) परभणीमधील सेलून येथून पत्रकार परिषदेत बोलत होते. (Maratha Reservation)
Maratha Reservation: आंदोलन शांततेत करणार, मात्र आरक्षण आम्ही घेणार
पुढे बोलताना ते म्हणाले, कायद्याच्या आधारे नोंदी असणारा केवळ मराठा समाज आहे, तरी देखील आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही. मराठे आणि कुणबी एकच हे आता सिद्ध झाले आहे. नोटीसा देऊन तुम्ही आंदोलन दडपू शकत नाही. शांततेत आंदोलन करणार, मात्र आरक्षण आम्ही घेणार असे देखील त्यांनी यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. (Maratha Reservation)
सरकारने लिहलेल्या चारही शब्दांवर ठाम- जरांगे-पाटील
सोयरे शब्द सरकारनेच लिहला. काल सरकारच्या शिष्टमंडळासोबत एका शब्दावर एकएक तास चर्चा झाली. अशा चार शब्दांवर चर्चा झाली. त्यांनी लिहलेल्या चारही शब्दांवर ठाम असल्याचेही जरांगे-पाटील म्हणाले. त्यामुळे शब्द लिहण्यापूर्वीच सरकारने विचार करायला पाहिजे होता, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. (Maratha Reservation)
दोन दिवसात निर्णय द्या, अन्यथा…
अधिवेशनाचा वेळ वाढवावा असं आम्ही सुचवलं. तुम्ही १४४ लागू का केलं तुम्ही नोटीसा का दिल्या? असा सवाल देखील त्यांनी सरकारला केला. राज्य चालवणारे, कायदा चालवणारे तुम्हीच. सरकारचा सगळा वेळ नोटीसा देण्यात, त्यामुळे सरकारने नोटीसांच्या भानगडीत पडू नये. दोन दिवसात निर्णय द्या, अन्यथा आंदोलन करू. आंदोलन हे शांततेतच होणार असा इशारा देखील मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
आईच्या मुलाला आरक्षण नाही हे किती विचित्र
आई आणि मुलाच्या रक्त्ताच्या नात्याहून मोठं नातं ते कोणतं ? आईच्या मुलाला आरक्षण नाही हे किती विचित्र आहे. पुढील दोन दिवसात काही झालं नाही, तर पुढची दिशा ठरवणार. तसेच आमचं पूर्ण ध्येय हे मराठा आरक्षणावर आहे, असे देखील जरांगे पाटील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले आहे.
हेही वाचा:

Jalgaon Crime : धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दंगल, 18 जणांविरोधात गुन्हा
Aditya Thackeray on government : आपला देश हुकूमशाहीकडे, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद, हल्ल्यामागे PAFF चा हात

The post शब्द त्यांचाच, त्यांनी २४ डिसेंबरच्या आत पूर्ण करावा- मनोज जरांगे पाटील appeared first on Bharat Live News Media.

Go to Source