Crime News : मटण खरेदीमध्ये तब्बल 61 लाख 62 हजारांचा अपहार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हॉटेलसाठी क्रेडिटवर मटणविक्रेत्या व्यापार्‍याकडून तब्बल 2 कोटी 91 लाखांचे मटण खरेदी केले. त्यातील 2 कोटी 30 लाख 19 हजार 675 रुपये दिले. मात्र, उर्वरित रक्कम 61 लाख 62 हजार 140 रुपये दिले नाहीत. याप्रकरणी फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात कोंढव्यातील बागवान हॉटेलच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … The post Crime News : मटण खरेदीमध्ये तब्बल 61 लाख 62 हजारांचा अपहार appeared first on पुढारी.

Crime News : मटण खरेदीमध्ये तब्बल 61 लाख 62 हजारांचा अपहार

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : हॉटेलसाठी क्रेडिटवर मटणविक्रेत्या व्यापार्‍याकडून तब्बल 2 कोटी 91 लाखांचे मटण खरेदी केले. त्यातील 2 कोटी 30 लाख 19 हजार 675 रुपये दिले. मात्र, उर्वरित रक्कम 61 लाख 62 हजार 140 रुपये दिले नाहीत. याप्रकरणी फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात कोंढव्यातील बागवान हॉटेलच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अफज (65, रा. कौसर बाग) आणि अहतेशाम अयाज बागवान (35) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत मटणविक्रेता शादाफनिजाम पटेल (43, रा. जान मोहम्मद स्ट्रीट, कॅम्प, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2019 ते 2023 दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागवान हॉटेलचे मालक बागवान यांनी फिर्यादी पटेल यांच्याकडून एकूण 2 कोटी 91 लाख रुपयांचे मटण, चाप, खिमा, गुरदा घेतले. त्यापैकी बागवान यांनी केवळ 2 कोटी 30 लाख 19 हजार रुपये दिले. उर्वरित 61 लाख 62 हजार न देता बागवान यांनी त्या रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास लष्कर पोलिस करत आहेत.
हेही वाचा

Rise Up: महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात
Reading party : वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ‘रीडिंग पार्टी’चा ट्रेंड
पस्तीशीनंतर आई व्हायचंय? हा आहे वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

The post Crime News : मटण खरेदीमध्ये तब्बल 61 लाख 62 हजारांचा अपहार appeared first on Bharat Live News Media.

Go to Source