Rise Up: महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘दै. पुढारी’ आयोजित आणि पूना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने महिलांसाठी राईज अप बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धा रविवार दि. 24 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून,  बॅडमिंटनप्रेमींनी र् पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन  करण्यात आले आहेत. या स्पर्धा पूना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या बॅडमिंटन … The post Rise Up: महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात appeared first on पुढारी.

Rise Up: महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ‘दै. Bharat Live News Media’ आयोजित आणि पूना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने महिलांसाठी राईज अप बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

या स्पर्धा रविवार दि. 24 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून,  बॅडमिंटनप्रेमींनी र् पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन  करण्यात आले आहेत. या स्पर्धा पूना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या शिवाजीनगर येथील पीडीएमबीएच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या सेनापती बापट शाखेचे व्यवस्थापक शेखर चोपडे आणि औंध शाखा व्यवस्थापिका सारिका गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पीडीएमबीएचे कार्यकारी मंडळ सदस्य आणि मुख्य पंच अनिरुध्द जोशी आणि सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ.  मधुरिका काटे यांसह मान्यवर उपस्थित होते.

दै. ‘Bharat Live News Media’च्या वतीने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि खेळाचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘राईज अप’ पुणे महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी सुरू झालेल्या फक्त महिलांसाठी ‘राईज अप’ या  क्रीडा स्पर्धांच्या उपक्रमाच्या ‘सीझन-2’ची सुरुवात या वर्षी सप्टेंबर महिन्यात बुद्धिबळ, कॅरम स्पर्धेने झाली होती. त्यानंतर महिलांच्या जिल्हास्तरीय कुस्ती, जलतरण, अ‍ॅथलेटिक्स आणि कबड्डी स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. राज्यात केवळ महिलांसाठी स्पर्धा घेणारा  दै. ‘Bharat Live News Media’ एकमेव माध्यम समूह आहे.

या ‘राईज अप सीझन-2’ साठी माणिकचंद ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून, सहप्रायोजक म्हणून रूपमंत्रा, मीडिया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, बँकिंग पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून   पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

‘दै. Bharat Live News Media’ने केवळ एका खेळामध्येच नाही, तर नऊ क्रीडाप्रकारांत केवळ महिलांसाठी क्रीडा स्पर्धा भरविलेल्या आहेत. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे माध्यम म्हणून ‘दै. Bharat Live News Media’ केवळ एकमेव आहे. अशा स्पर्धांमधून खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असून, विशेषतः न खेळणार्‍या मुलींनाही त्यापासून प्रेरणा मिळणार आहे. ‘दै. Bharat Live News Media’ने अशाच स्पर्धा आगामी काळातही घेऊन महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे.

– शेखर चोपडे,  सेनापती बापट शाखा व्यवस्थापक,  लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी

‘दै. Bharat Live News Media’ने गेल्या वर्षीही केवळ महिलांसाठी ‘राईज अप’ स्पर्धा भरविल्या होत्या. या वर्षी सलग दुसरे वर्ष असून, गेल्या वर्षापेक्षा महिलांची दुप्पट नावनोंदणी होऊन सहभाग वाढलेला आहे. 350 हून अधिक महिला-मुलींनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधून आपला सहभाग नोंदविला असून, ‘दै. Bharat Live News Media’ या स्पर्धांमधून सातत्य राखत आगामी काळात ही या स्पर्धा सुरूच ठेवून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे.

– अनिरुध्द जोशी,  कार्यकारी मंडळ सदस्य,  पीडीएमबीए आणि मुख्य पंच

‘दै. Bharat Live News Media’ने केवळ महिलांसाठी अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून महिलांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. अशा स्पर्धांमधून नक्कीच महिलांना प्रोत्साहन मिळणार असून, हा स्तुत्य उपक्रम आहे. ‘दै. Bharat Live News Media’ने आगामी काळातही असेच वेगवेगळे उपक्रम राबवावेत.

– सारिका गायकवाड,  औंध शाखा व्यवस्थापक,  लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी

हेही वाचा

पाकिस्तानची बदमाशी
पस्तीशीनंतर आई व्हायचंय? हा आहे वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
४ वर्षांहून लहान मुलांना ‘ते’ कफ सिरप देऊ नका

The post Rise Up: महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात appeared first on Bharat Live News Media.

Go to Source