फॅमिली लॉयर्स असोसिएशनला दणका; निवडणुका घेण्याचे आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची संघटना असलेल्या फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनने सदस्य नोंदणीस सुरुवात करून निवडणुका घेण्याचे आदेश सहधर्मादाय आयुक्त पी. पी. चव्हाण यांनी नुकतेच दिले. मागील काही वर्षांपासून नवीन सभासदांची रखडलेली नोंदणी तसेच असोसिएशनकडून होणार्‍या बिनविरोध निवडीविरोधात न्यायालयातील काही वकिलांनी धर्मादाय आयुक्तांलयात धाव घेत दाद मागितली होती. कौटुंबिक न्यायालयात … The post फॅमिली लॉयर्स असोसिएशनला दणका; निवडणुका घेण्याचे आदेश appeared first on पुढारी.

फॅमिली लॉयर्स असोसिएशनला दणका; निवडणुका घेण्याचे आदेश

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची संघटना असलेल्या फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनने सदस्य नोंदणीस सुरुवात करून निवडणुका घेण्याचे आदेश सहधर्मादाय आयुक्त पी. पी. चव्हाण यांनी नुकतेच दिले. मागील काही वर्षांपासून नवीन सभासदांची रखडलेली नोंदणी तसेच असोसिएशनकडून होणार्‍या बिनविरोध निवडीविरोधात न्यायालयातील काही वकिलांनी धर्मादाय आयुक्तांलयात धाव घेत दाद मागितली होती.

कौटुंबिक न्यायालयात कार्यरत असलेली फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन ही एक विश्वस्त संस्था असून, त्याची स्वतंत्र घटना आहे. न्यायालयात तीन वर्षांच्या अधिक काळापासून प्रॅक्टिस करणार्‍या वकिलांना सभासदत्व करून देणे ही असोसिएशनची जबाबदारी आहे. तसेच तो वकिलांचा हक्कही आहे.  नियमानुसार पात्र ठरलेल्या वकिलांना घटनेतील तरतुदीप्रमाणे सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन करा. त्यानंतर, अर्जाची छाननी करून त्यांना सभासद करून घ्या. आदेशाची पूर्तता व्यवस्थित होत आहे. की नाही याची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल करण्यासाठी आयुक्तांनी ए. बी. जाधव यांची निरीक्षक नेमणूक केली आहे. त्यामुळे, निवडणुकांमध्ये पारदर्शकता येऊन त्या निष्पपक्ष होतील, असेही सहधर्मादाय आयुक्त चव्हाण यांनी निकालात नमूद करण्यात
आले आहे.
सभासद संख्या आली पन्नासवर
फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन स्थापन झाल्यानंतर सभासदांची संख्या ही तीनशेपर्यंत होती. त्यांपैकी 189 सभासद कायमस्वरूपी होते. यादरम्यान, विविध घडामोडीं घडल्यानंतर त्यांचे सभासदत्व बरखास्त करण्यात आले. त्यानंतर, ही संख्या 50 च्या आत आली होती. त्यावर, आयुक्तांनी संबंधित कायमस्वरूपी 189 सभासदांना पुन्हा नव्याने सभासदत्व द्यावे, असेही सांगितले आहे.

असोसिएशनसाठी सभासदत्व देण्याबाबतचा निर्णय यापूर्वीच झाला होता. मात्र, कामाच्या व्यापामुळे सभासदत्व देण्याची प्रक्रिया रखडली होती. धर्मादाय आयुक्तांसमोर वादी व प्रतिवादीच्या यांच्यामध्ये तडजोड झाली. आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार व असोसिएशनच्या घटनेनुसार सभासदत्व देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

– अ‍ॅड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणे

हेही वाचा

बहिणीला दारू पिऊन द्यायचा त्रास; मेहुण्याने काढला दाजीचा काटा
४ वर्षांहून लहान मुलांना ‘ते’ कफ सिरप देऊ नका
पीएमपीच चाललंय काय? सात दिवसांत 324 बस ब्रेकडाऊन

The post फॅमिली लॉयर्स असोसिएशनला दणका; निवडणुका घेण्याचे आदेश appeared first on Bharat Live News Media.

Go to Source