बहिणीला दारू पिऊन द्यायचा त्रास; मेहुण्याने काढला दाजीचा काटा

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : बहिणीला दारू पिऊन त्रास देणार्या दाजीचा मेहुण्याने मित्राच्या मदतीने धारदार लोखंडी हत्याराने वार करून खून केला. राजेश कुमार कांबळे (वय 25, रा. राहुल बालवडकर चाळ, बालेवाडी) असे दाजीचे नाव आहे. तो हाऊसकिपींगची कामे करीत होता. याप्रकरणी 17 वर्षीय युवकाने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेहुणा राहुल शेषराव रिकामे (वय 20,रा. बालेवाडी) आणि त्याच्या मित्राच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 20 डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास गोल्डन टेरेस सोसायटीजवळील मोकळ्या जागेत बालेवाडी येथे घडली आहे.
याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले, खून झालेला तरुण राजेश कांबळे याने आरोपी राहुल रिकामे याच्या बहिणीसोबत तीन वर्षांपूर्वी लग्न केले होते. कांबळे याला दारूचे व्यसन आहे. तो रिकामे याच्या बहिणीला त्रास देत होता. रिकामे आणि कांबळे अनेकदा एकत्र दारू पित होते. 19 डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास रिकामे, त्याचा मित्र आणि राजेश कांबळे हे एकत्र शेकोटी करून बसले होते. त्या वेळी फिर्यादी युवकदेखील तेथे होता. आरोपींनी राजेश याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. राजेश मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा
४ वर्षांहून लहान मुलांना ‘ते’ कफ सिरप देऊ नका
पीएमपीच चाललंय काय? सात दिवसांत 324 बस ब्रेकडाऊन
सांगली : सोयाबीनचे उत्पादन कमी, तरीही दरात घट
The post बहिणीला दारू पिऊन द्यायचा त्रास; मेहुण्याने काढला दाजीचा काटा appeared first on Bharat Live News Media.
