Weather Update : गार वाऱ्यांची राज्याकडे कुच; येत्या 48 तासांत थंडी वाढणार

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तीव्र झाला असून, अरबी समुद्रातही चक्रीय स्थिती तयार झाल्याने गार वारे वेगाने वाहणार आहेत. त्यामुळे आगामी 48 तासांत थंडी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. उत्तर भारतातील बहुतांश शहरांचे तापमान 4 ते 8 अंशांवर गेले असून, त्या भागात खूप दाट धुके तयार झाल्याने द़ृश्यमानता 50 टक्क्यांहून कमी झाली आहे. अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्याने तेथून गार वारे राज्याकडे शनिवारपासून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी 48 तासांत राज्यात थंडी अधिक तीव्र होईल.
गुरुवारचे किमान तापमान
गोंदिया 9, नागपूर 10.6, वाशिम 10.8, वर्धा 12, यवतमाळ 9.5, अकोला 12.8, अमरावती 11.2, चंद्रपूर 9.2, पुणे 14.9, नगर 14.3, मुंबई 23.2, जळगाव 10.4, कोल्हापूर 17.0, महाबळेश्वर 14.6, मालेगाव 13.2, नाशिक 15, सांगली 16, सातारा 16.6, सोलापूर 17, छत्रपती संभाजीनगर 13.6, परभणी 12.9, नांदेड 13.0, बीड 13.4.
हेही वाचा
Kolhapur News : थेट पाईपलाईनला तुरंबेनजीक मोठी गळती
Indw vs Ausw test : पहिल्याच दिवशी भारताचे वर्चस्व
गुलाबराव पाटील यांच्याकडून दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना मदत
The post Weather Update : गार वाऱ्यांची राज्याकडे कुच; येत्या 48 तासांत थंडी वाढणार appeared first on Bharat Live News Media.
