गुलाबराव पाटील यांच्याकडून दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना मदत

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : धरणगाव तालुक्यातील साकरे येथे नुकतीच आग लागून चार घरांमधील लाखांचे साहित्य जळून खाक झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरूवारी (दि.२१) साकरे गावाला भेट देत आग दुर्घटनेतील कुटुंबियांच्या वेदनेवर मायेची फुंकर घातली. यावेळी आग दुर्घटनेतील कुटुंबियांना तात्काळ रेशनकार्ड, घरातील भांडी, गॅस हंडी, शेगडी आणि किराणा कीटचे वाटप करण्यात आले. एवढेच नव्हे तर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना तात्काळ सर्वांचे घरकुलचे प्रकरणी मंजूर करण्याचे आदेश दिले.
गुलाबराव पाटील ऑन जितेंद्र आव्हाड
अजित पवार व एकनाथ शिंदे यांना कमळ चिन्हावर आगामी निवडणुका लढवाव्या लागतील, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील प्रतिक्रिया दिली. वेळ जशी येईल, तसे पाहू आणि त्यांच्या बोलण्याला अर्थ नाही. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे कुठलाच मार्ग राहिला नाही. आमचं काम आहे लोकांचं काम करावं, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटील ऑन संजय राऊत कोविड घोटाळा आरोप
संजय राऊत यांनी बोलताना म्हटले आहे की, कोविड काळात गुलाबराव पाटील यांनी भ्रष्टाचार केला असून याचे पत्र आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले आहे. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील की, संजय राऊत यांना आपापसात भांडण लावण्याशिवाय दुसरं काय जमत. संजय राऊत यांना स्वतःचे आमदार सांभाळता आले नाहीत, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. कोर्टात ती केस फेटाळली असून कोरोनाच्या काळात साहित्य खरेदीचे सर्वे अधिकार जिल्हाधिकारी यांना होते. कारण ते आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असतात, पालकमंत्री फक्त सुचना करीत असतात. संजय राऊत हे आमच्यात भांडण लावण्याचे काम करत आहेत. संजय राऊत यांनी आपले १६ आमदार सांभाळावेत, असाही टोला पाटील यांनी राऊत यांना लगावला.
गुलाबराव पाटील ऑन विजय वडेट्टीवार
भाजप लोकसभेपुरतं हात फिरवेल, नंतर शिंदे व अजित पवार यांना दूर करेल, असा टोला काँगेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे, अजित पवार गटाला लगावला होता. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जसे आमचे नेते एकनाथ शिंदे निर्णय घेतील तसे आम्ही काम करू. आता आम्ही जे आहोत ते एकनाथ शिंदे यांच्या भरोशावर असून ते सांगतील, त्या पद्धतीने आम्ही काम करू. कोणत्या पक्षावर लढायचं, कसं लढायचं आमचे नेते ठरवतील असेही ते म्हणाले.
हेही वाचा :
निवडणूक भाजपसोबत पण धनुष्यबाणवरच : आमदार संजय शिरसाट
Parliament Winter Session: मुदतीआधी संसद अधिवेशन गुंडाळले, अंतिम दिनी देखील ३ खासदारांचे निलंबन
Maratha Reservation : गिरीष महाजन यांची मोठी घोषणा, म्हणाले; ‘सगेसोयऱ्यांपैकी रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाच आरक्षण’
The post गुलाबराव पाटील यांच्याकडून दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना मदत appeared first on Bharat Live News Media.
