निवडणूक भाजपसोबत पण धनुष्यबाणवरच : आमदार संजय शिरसाट

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : आगामी निवडणूक आम्ही भाजपसोबत युतीतच लढणार असलो तरी निवडणूक धनुष्यबाण चिन्हावरच लढविली जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आ संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात एकट्याने निवडणूक लढवण्याचा भाजपने निर्णय घेतल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने आज राजकीय वातावरण तापले. संघ भाजपने ही शक्यता फेटाळून लावली या पार्श्वभूमीवर शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली. भाजप,संघाच्या गुप्त बैठकीत यासंदर्भात निर्णय झाल्याचा दावाही आव्हाड यांनी केला. शिंदे यांचे प्रवक्ते असलेले शिरसाट म्हणाले की, आगामी निवडणुका आम्ही भाजपसोबत युतीत लढणार असून, त्या धनुष्यबाणावरच लढल्या जाणार आहेत. यासंबंधी भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत स्पष्ट संवाद झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांनी कमळावर निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असेही शिरसाट म्हणाले. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे विशेषतः विदर्भातील तिकीट बदलणार, कुणाला भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार अशी चर्चा जोरात आहे. अधिकाधिक खासदार भाजपच्या चिन्हावर निवडून आणण्याच्या प्रयत्नात भाजप असल्याची चर्चा या विद्यमान खासदारांची विशेषतः शिंदे गटाची चिंता वाढविणारी आहे.
The post निवडणूक भाजपसोबत पण धनुष्यबाणवरच : आमदार संजय शिरसाट appeared first on Bharat Live News Media.

Home ठळक बातम्या निवडणूक भाजपसोबत पण धनुष्यबाणवरच : आमदार संजय शिरसाट
निवडणूक भाजपसोबत पण धनुष्यबाणवरच : आमदार संजय शिरसाट
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आगामी निवडणूक आम्ही भाजपसोबत युतीतच लढणार असलो तरी निवडणूक धनुष्यबाण चिन्हावरच लढविली जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आ संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. राज्यात एकट्याने निवडणूक लढवण्याचा भाजपने निर्णय घेतल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने आज राजकीय वातावरण तापले. संघ भाजपने ही शक्यता फेटाळून लावली …
The post निवडणूक भाजपसोबत पण धनुष्यबाणवरच : आमदार संजय शिरसाट appeared first on पुढारी.
