चंद्रपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तीन दिवसाच्या ताडोबा मुक्कामी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : पत्नी आणि मित्रांसह ताडोबात तीन दिवसांच्या मुक्कामी आलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना आल्या आल्याच गुरूवारी (दि. २१) सायंकाळच्या कोलारा गेटव्दारे केलेल्या सफारीत ताडोबात तारा, बबली, बिजली आणि युवराजने सलामी दिली. मात्र विशेष लढा असलेल्या माया वाघिणीचे दर्शनापासून मुकावे लागणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे पत्नी अंजली सह काही मित्रांसोबत … The post चंद्रपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तीन दिवसाच्या ताडोबा मुक्कामी appeared first on पुढारी.

चंद्रपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तीन दिवसाच्या ताडोबा मुक्कामी

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : पत्नी आणि मित्रांसह ताडोबात तीन दिवसांच्या मुक्कामी आलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना आल्या आल्याच गुरूवारी (दि. २१) सायंकाळच्या कोलारा गेटव्दारे केलेल्या सफारीत ताडोबात तारा, बबली, बिजली आणि युवराजने सलामी दिली. मात्र विशेष लढा असलेल्या माया वाघिणीचे दर्शनापासून मुकावे लागणार आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे पत्नी अंजली सह काही मित्रांसोबत आज गुरूवारी तिन वाजताच्या सुमारास नागपूर मार्गे ताडोबात पर्यटन सफारीकरिता दाखल झाले. ताडोबात दाखल झाल्यानंतर ते सर्वप्रथम बांबू रिसॉर्ट मध्ये थांबले. काही वेळ थांबून त्यांनी सायंकाळची पर्यटन सफारी कोलरा गेटद्वारे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिन पुढचे तीन दिवस ताडोबात मुक्कामी असणार आहेत.  या तिन दिवसात सचिन ताडोबात वेगवेगळ्या गेटव्दारे सफारी करतील. आज ताडोबात आल्या आल्यानंतर सायंकाळी त्यांनी कोलारा गेटद्वारे पहिली सफारी आटोपली. साडेतीनच्या सुमारास कोअर झोन मधील कोलारा गेटव्दारे कोअर झोनमध्ये प्रवेश केला.  पहिल्याच सफारीत कोलाराचे विशेष आकर्षण असलेले तारा, बबली,बिजली आणि युवराजने सचिनला दर्शन दिले. बबली आणि बिजलीचे बछड्यासह दर्शन झाले. तारा, बबली, बिजली आणि युवराजच्या दर्शनाने सचिन पत्नी चांगलेच भारावले. सायंकाळी ते उशिरापर्यंत सफारी आटोपुन बांबु रिसॉर्ट मध्ये परतले.
सचिनची या वर्षातील ताडोबातील हि तिसरी सफारी आहे. आतापर्यंत त्यांच्या सहा सफारी झाली आहे. विशेष म्हणजे सचिनला माया वाघिणीचा चांगला लढा आहे. परंतु यावेळी सचिनला माया वाघिणी बद्दल असलेला लढा पूर्ण करता येणार नाही.
माया वाघिणीचा निमढेला, अलिझंजा आणि नवेगाव क्षेत्रात अधिवास होता. त्यामुळे प्रत्येकवेळी ती सचिनला दर्शन द्यायची. मायाचे दर्शन झाल्याशिवाय सचिनची पर्यटन सफारी अपूर्ण असायची. पण यावेळी मात्र त्यांना खरचं मायाचे दर्शन होणार नाही. कारण काही महिन्यापासून माया  ताडोबात दिसेनाशी झाली होती. अखेर तिचा काहीच महिन्यांपूर्वी ताडोबात मृत्तदेह आढळून आला. त्यामुळे ताडोबाची क्वीन असलेली माया वाघिणीच्या फक्त आठवनी उरल्या आहेत. मायाच्या मृत्यूने सचिनची सफारी यावेळी अपूर्णच राहणार आहे. आता या क्षेत्रात  भानुस खिंडीचे वास्तव आहे. तिचेही आकर्षण सचिनला आहे.
The post चंद्रपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तीन दिवसाच्या ताडोबा मुक्कामी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source