सोलापूर : अकलूज-माळशिरस मार्गावर शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात, १ शिक्षक ठार तर ४ जखमी

अकलूज; Bharat Live News Media वृत्तसेवा : अकलूज-माळशिरस रोडवर आयशर ट्रकला शैक्षणिक सहलची एस.टी बस धडकून या अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एकजण ठार तर चौघेजण जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि. २१) पहाटे ६ च्या सुमारास (वटफळी ता.माळशिरस) हद्दीत घडली. या अपघातातील बस चालक व ट्रक चालक दोघावर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अकलुज पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बावडा (ता.इंदापुर जि. पुणे) येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कोकण दर्शन शैक्षणिक सहल करुन परत निघालेली होती. या शैक्षणीक सहल तीन एसटी बसने निघालेल्या होत्या. त्यापैकी ४० विद्यार्थ्यांच्या अकलूज आगाराच्या एस.टी.बसने (क्र.एम.एच.१४ बीटी ४७०१) गुरुवारी (दि. २१) पहाटे ६ च्या सुमारास अकलूज-माळशिरस मार्गावर वटफळी हद्दीत थांबलेल्या ट्रकला (क्र. एम.एच. ०९ एफ.एल. ३३९८) पाठीमागून धडक दिली. या अपघातात शिवाजी विद्यालयाचे शिक्षक बाळकृष्ण हरीबा काळे (वय ५३ रा.रेडणी ता.इंदापुर) हे जागीच ठार झाले. शिक्षिका संगिता शिवाजी कवडे व शिक्षक रमाकांत शिवदास शिरसाट (रा. बावडा) व दोन विद्यार्थी हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची अकलूज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
राजे खान पठाण असे या अपघातातील धडक दिलेल्या एस.टी.चालकाचे नाव असून रमाकांत शिरसाट यांनी चालकाच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पो.हे.काॅ.पांडुरंग मुंडे हे करीत आहेत.
The post सोलापूर : अकलूज-माळशिरस मार्गावर शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात, १ शिक्षक ठार तर ४ जखमी appeared first on Bharat Live News Media.

Home ठळक बातम्या सोलापूर : अकलूज-माळशिरस मार्गावर शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात, १ शिक्षक ठार तर ४ जखमी
सोलापूर : अकलूज-माळशिरस मार्गावर शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात, १ शिक्षक ठार तर ४ जखमी
अकलूज; पुढारी वृत्तसेवा : अकलूज-माळशिरस रोडवर आयशर ट्रकला शैक्षणिक सहलची एस.टी बस धडकून या अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एकजण ठार तर चौघेजण जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि. २१) पहाटे ६ च्या सुमारास (वटफळी ता.माळशिरस) हद्दीत घडली. या अपघातातील बस चालक व ट्रक चालक दोघावर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. …
The post सोलापूर : अकलूज-माळशिरस मार्गावर शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात, १ शिक्षक ठार तर ४ जखमी appeared first on पुढारी.
