चंद्रपूर : पिटीचुवा जंगलात अवैध वाळूचे ट्रॅक्टरखाली दबून मजुराचा मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चिमूर तालुक्यातील पिटीचुवा जंगलातून रेतीचे ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करीत असताना एका 19 वर्षीय युवकाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी (२१ डिसेंबर) ला पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास घडली.खडसंगी जवळील नवेगाव (रामदेगी) येथील आकाश सोनटक्के असे मृत्ताचे नाव आहे. खडसंगी जवळील नवेगाव (रामदेगी) येथील आकाश सोनटक्के हा  चिमूर तालुक्यातील पिटीचुवा … The post चंद्रपूर : पिटीचुवा जंगलात अवैध वाळूचे ट्रॅक्टरखाली दबून मजुराचा मृत्यू appeared first on पुढारी.

चंद्रपूर : पिटीचुवा जंगलात अवैध वाळूचे ट्रॅक्टरखाली दबून मजुराचा मृत्यू

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : चिमूर तालुक्यातील पिटीचुवा जंगलातून रेतीचे ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करीत असताना एका 19 वर्षीय युवकाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी (२१ डिसेंबर) ला पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास घडली.खडसंगी जवळील नवेगाव (रामदेगी) येथील आकाश सोनटक्के असे मृत्ताचे नाव आहे.
खडसंगी जवळील नवेगाव (रामदेगी) येथील आकाश सोनटक्के हा  चिमूर तालुक्यातील पिटीचुवा फॉरेस्ट FDCM जंगल खडसंगी या क्षेत्रात रेतीची आयात करण्यासाठीं गेला होता. सोबत गावातीलच  6 सोबती होते.  नेहमी प्रमाणे रांत्रीच्या सुमारास ते पिटीचुवा जंगलातुन रेतीची अवैध वाहतूक करण्याकरिता गेले होते. रात्रोला सहा ते सात ट्रिप वाहतूक केल्यानंतर पहाटेच्या सुमारात   ट्रॅक्टर भरून गाडी खाली करण्यासाठी जात असताना काही अंतरावरच आकाश सोनटक्के युवक ट्रॅक्टर वरुन खाली पडला. चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने मागच्या चाकामध्ये तो  दबल्या गेला. ट्रॅक्टर चालक रोशन जाधव याने आरडाओरड केल्याने अन्य मजुरांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.  तालुक्यात मोठया प्रमाणावर दिवसा व रातत्रीला प्रादेशिक , बफर , FDCM , या जंगलातून चोरटे मार्ग तयार करून रेतीची चोरी केली जात आहे.
चिमूर ठाण्यातील उपनिरीक्षक सोरते कुणाल राठोर , सचिन खामनकर यांनी घटनास्थळी जावून मृत्तदेह ताब्यात घेतला. मृत तरुण हा आई वडिलांना एकुलता एक होता.
The post चंद्रपूर : पिटीचुवा जंगलात अवैध वाळूचे ट्रॅक्टरखाली दबून मजुराचा मृत्यू appeared first on Bharat Live News Media.

Go to Source