‘सगेसोयऱ्यांपैकी रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाच मिळणार आरक्षण’: महाजन

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनावर ठाम असलेल्या जरांगे पाटील यांना आज शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, गिरीष महाजन, संदीपान भुमरे यांचा समावेश होता. यावेळी बोलत असताना ‘सगेसोयऱ्यांपैकी रक्ताच्या नात्यामधील व्यक्तींनाच मिळणार आरक्षण’ असे महाजन यांनी सांगितले. मराठा आऱक्षण प्रश्नी सुरु असलेले जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबर ही डेडलाईन … The post ‘सगेसोयऱ्यांपैकी रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाच मिळणार आरक्षण’: महाजन appeared first on पुढारी.
‘सगेसोयऱ्यांपैकी रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाच मिळणार आरक्षण’: महाजन


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनावर ठाम असलेल्या जरांगे पाटील यांना आज शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, गिरीष महाजन, संदीपान भुमरे यांचा समावेश होता. यावेळी बोलत असताना ‘सगेसोयऱ्यांपैकी रक्ताच्या नात्यामधील व्यक्तींनाच मिळणार आरक्षण’ असे महाजन यांनी सांगितले.
मराठा आऱक्षण प्रश्नी सुरु असलेले जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबर ही डेडलाईन दिली आहे. सरसकट मराठा समाजाला   आरक्षण द्या या मागणीवर ते ठाम आहेत. आज शिष्टमंडळाने त्यांना भेट देऊन आरक्षण देण्याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. दरम्यान या महाजन यांनी आमदार बच्चू कडू यांना फोन करुन चर्चा देखील केली. यावेळी जरांगे पाटील यांनी आरक्षण घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही असे देखील स्पष्ट केले.
नातेवाईकांना आरक्षण कसे लागू करणार या जरांगे यांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना महाजन म्हणाले की, सगेसोयरे यामध्ये सर्वजण येत नाहीत. मागील चर्चेत सगेसोयरे असा शब्द आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. जरांगे यांनी सगे सोयरे याचा अर्थ शब्दश: घेतला आहे. सोयरे यामध्ये पत्नी, व्याही यांचा समावेश होत नाही असं म्हणत फक्त रक्ताच्या नात्यातलेच सोयरेमध्ये येतात असे सांगितले.
The post ‘सगेसोयऱ्यांपैकी रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाच मिळणार आरक्षण’: महाजन appeared first on Bharat Live News Media.

Go to Source