पाथर्डीत पाठलाग करून पकडले दोन ट्रॅक्टरचोर

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : ट्रॅक्टरची चोरी करणार्‍या दोन चोरट्यांना नागरिकांनी पकडून चोप दिला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रवीण ऊर्फ बंटी विजय मोरे (वय 22, तनपुरवाडी, ता.पाथर्डी) व दीपक रूपेश म्हस्के (वय 19, सामनगाव, ता. शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत. पाथर्डी-बीड रस्त्यावरील आयटीआय चौकाजवळ हंडाळवाडी शिवारात भीमराव चंद्रकांत हंडाळ यांची वीटभट्टी आहे. तेथे … The post पाथर्डीत पाठलाग करून पकडले दोन ट्रॅक्टरचोर appeared first on पुढारी.

पाथर्डीत पाठलाग करून पकडले दोन ट्रॅक्टरचोर

पाथर्डी तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : ट्रॅक्टरची चोरी करणार्‍या दोन चोरट्यांना नागरिकांनी पकडून चोप दिला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रवीण ऊर्फ बंटी विजय मोरे (वय 22, तनपुरवाडी, ता.पाथर्डी) व दीपक रूपेश म्हस्के (वय 19, सामनगाव, ता. शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत. पाथर्डी-बीड रस्त्यावरील आयटीआय चौकाजवळ हंडाळवाडी शिवारात भीमराव चंद्रकांत हंडाळ यांची वीटभट्टी आहे. तेथे मंगळवारी (दि.19) रात्री साडेदहा वाजता ट्रॅक्टर उभा करण्यात आला होता. भीमराव हंडाळ शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले असताना हा ट्रॅक्टर मंगळवारी रात्री या दोघा चोरट्यांनी पळविला. याबाबत माहिती मिळताच हंडाळ यांनी मोटारसायकलवरून मोहट्याच्या दिशेने पाठलाग केला.
करोडी बसस्थानकावर बंटी मोरे ट्रॅक्टर घेऊन चालला होता. हंडाळ यांना पाहताच मोरे ट्रॅक्टर बंद करून पळू लागला. त्याच्याबरोबर दुचाकीवर चाललेला दीपक म्हस्के हाही पळून जाऊ लागला. करोडी ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला. पळताना पडल्याने मोरे जखमी झाला. दोघा आरोपींना पकडून ग्रामस्थांनी मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले.
हेही वाचा :

Pune : विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू
ठाणे : पतीने केली पत्नीसह दोघा चिमुकल्यांचा खून; ठाण्यातील कासारवडवली येथील घटना

 
The post पाथर्डीत पाठलाग करून पकडले दोन ट्रॅक्टरचोर appeared first on Bharat Live News Media.

Go to Source