प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटणची घरच्या मैदानावर विजयाने सांगता
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत आता पर्यंत अनिश्चित कामगिरी करणार्या पुणेरी पलटण संघाने घरच्या मैदानावरील अखेरच्या साखळी सामन्यात बेंगळुरू बुल्स संघाचा 43-17 असा धुव्वा उडवून आव्हान कायम राखले. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरू असलेल्या या लढतीत या विजयामुळे पुणेरी पलटण संघाने गुण तालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखले. पुणेरी पलटण संघाने पूर्वार्धात सामन्यावर वर्चस्व गाजवताना लवकरच 23-5 अशी आघाडी घेतली. एकूण 10 पकडी करताना पुणेरी पलटण संघाने मध्यांतराला 20 गुणांची आघाडी घेतली.
पूर्वार्धात दोन लोन चढवणार्या पुणेरी पलटण संघाने उत्तरार्धाच्या सुरुवातीला तिसरा लोन चढवून 33-10 अशी निर्णायक आघाडी मिळवली. यानंतर मोहंमद रिझाचीयानेहने केलेले प्रयत्न आणि बुल्सक्या इतर खेळाडूंनी दिलेली साथ यामुळे बेंगळूरची पिछाडी कमी झाली. तरीही पलटण संघाने आपली आगेकूच कायम राखताना 26 गुणांनी दणदणीत विजयाची नोंद केली.
The post प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटणची घरच्या मैदानावर विजयाने सांगता appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटणची घरच्या मैदानावर विजयाने सांगता
प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटणची घरच्या मैदानावर विजयाने सांगता
पुणे : पुढारी वृत्तसेवा : दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत आता पर्यंत अनिश्चित कामगिरी करणार्या पुणेरी पलटण संघाने घरच्या मैदानावरील अखेरच्या साखळी सामन्यात बेंगळुरू बुल्स संघाचा 43-17 असा धुव्वा उडवून आव्हान कायम राखले. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरू असलेल्या या लढतीत या विजयामुळे पुणेरी पलटण संघाने गुण तालिकेत आपले …
The post प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटणची घरच्या मैदानावर विजयाने सांगता appeared first on पुढारी.