IND vs SA ODI : द. आफ्रिकेने टॉस जिंकला, भारताची फलंदाजी

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना पार्ल येथील बोलंड पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची धावसंख्या 2 षटकात बिनबाद 17 आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ रीझा हेंड्रिक्स, टोनी डी जॉर्जी, … The post IND vs SA ODI : द. आफ्रिकेने टॉस जिंकला, भारताची फलंदाजी appeared first on पुढारी.

IND vs SA ODI : द. आफ्रिकेने टॉस जिंकला, भारताची फलंदाजी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : IND vs SA ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना पार्ल येथील बोलंड पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची धावसंख्या 2 षटकात बिनबाद 17 आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ
रीझा हेंड्रिक्स, टोनी डी जॉर्जी, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स, ब्यूरन हेंड्रिक्स.
भारतीय संघ
संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
रजत पाटीदारला पदार्पणाची संधी मिळाली आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका खिशात घालेल. सध्या 3 सामन्यांची द्विपक्षीय मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिला सामना भारताने 8 गडी राखून जिंकला होता, तर दुसरा सामना यजमान दक्षिण आफ्रिकेने 8 विकेटने जिंकला होता.
भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवल्यास आफ्रिकेच्या भूमीवर दुसरी वनडे मालिका जिंकली जाईल. 2018 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने तेथे पहिली मालिका जिंकली होती. मात्र, पार्लच्या मैदानावर टीम इंडियाचे रेकॉर्ड खराब आहे. भारतीय संघाने येथे एकूण 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होते. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2003 पासून टीम इंडियाला या मैदानावर विजय मिळवता आलेला नाही. संघाचा शेवटचा विजय नेदरलँडविरुद्ध होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 द्विपक्षीय मालिका झाल्या आहेत. दोन्ही संघांनी 7-7 अशी मालिका जिंकली आहे.
 
The post IND vs SA ODI : द. आफ्रिकेने टॉस जिंकला, भारताची फलंदाजी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source