राम मंदिरात रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी यांना निमंत्रण

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांना २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना वैयक्तिकरित्या निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. पंतप्रधान मोदी राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. श्री राम जन्मभूमि … The post राम मंदिरात रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी यांना निमंत्रण appeared first on पुढारी.

राम मंदिरात रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी यांना निमंत्रण

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांना २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना वैयक्तिकरित्या निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. पंतप्रधान मोदी राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यासाच्या वतीने काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले. सोनिया गांधी किंवा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन    खर्गे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, असे बोलले जात होते. मात्र सोनिया गांधी याविषयी सकारात्मक आहेत. त्या या कार्यक्रमाला जातील किंवा त्यांच्या वतीने शिष्टमंडळ जाईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना या कार्यक्रमाचे सर्वात आधी निमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका करण्यात आली होती. देव फक्त एका पक्षाचे आहेत का असा प्रश्न विचारात सर्वांनाच निमंत्रण दिले पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती.
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, रामनाथ कोविंद यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच डी देवेगौडा यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. आणखी निमंत्रण पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून, येत्या काही दिवसांत विरोधी पक्षांच्या काही नेत्यांना निमंत्रणे मिळणार आहेत. दरम्यान, या समारंभासाठी सर्व राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे मात्र त्यात काही राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्यातील राजकीय पक्षांचे प्रमुख निमंत्रितांच्या यादीत नाहीत.
भाजपचे अर्धव्यू लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना विश्व हिंदू परिषदेने मंगळवारी निमंत्रित केले. प्रकृतीने परवानगी दिल्यास या समारंभात सहभागी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले.
आध्यात्मिक नेते, कलावंत, उद्योगपतींनाही निमंत्रण
काशी विश्वनाथ, वैष्णो देवी यांसारख्या मंदिरांचे प्रमुख आणि काही संवैधानिक, धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी, आध्यात्मिक नेते दलाई लामा, केरळच्या माता अमृतानंदमयी, योगगुरू बाबा रामदेव, अभिनेते रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अरुण गोविल, चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर तर उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, इस्रोचे संचालक नीलेश देसाई यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच चार हजार संत आणि दोन हजारांपेक्षा जास्त व्हीआयपी लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे.
The post राम मंदिरात रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी यांना निमंत्रण appeared first on Bharat Live News Media.

Go to Source