पुन्हा खरेदीचा माहौल! सेन्सेक्स ३५८ अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांना ४ लाख कोटींचा फायदा

पुढारी ऑनलाईन : सुरुवातीच्या व्यवहारात घसरलेल्या सेन्सेक्सने गुरुवारी दिवसाच्या निच्चांकी पातळीवरुन जोरदार पुनरागमन केले. बँका, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये खरेदीचा माहौल पुन्हा परतला. तसेच हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे शेअर्स आजच्या ट्रेडिंग सत्रात १.५० टक्क्यांनी वाढला. यामुळे सेन्सेक्स वाढीला आधार मिळाला. सेन्सेक्स आज ३५८ अंकांनी वाढून ७०,८६५ वर बंद झाला. तर निफ्टी १०४ अंकांनी वाढून … The post पुन्हा खरेदीचा माहौल! सेन्सेक्स ३५८ अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांना ४ लाख कोटींचा फायदा appeared first on पुढारी.

पुन्हा खरेदीचा माहौल! सेन्सेक्स ३५८ अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांना ४ लाख कोटींचा फायदा

Bharat Live News Media ऑनलाईन : सुरुवातीच्या व्यवहारात घसरलेल्या सेन्सेक्सने गुरुवारी दिवसाच्या निच्चांकी पातळीवरुन जोरदार पुनरागमन केले. बँका, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये खरेदीचा माहौल पुन्हा परतला. तसेच हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे शेअर्स आजच्या ट्रेडिंग सत्रात १.५० टक्क्यांनी वाढला. यामुळे सेन्सेक्स वाढीला आधार मिळाला. सेन्सेक्स आज ३५८ अंकांनी वाढून ७०,८६५ वर बंद झाला. तर निफ्टी १०४ अंकांनी वाढून २१,२५५ वर स्थिरावला. यामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४.१८ लाख कोटी रुपयांनी वाढून ते ३५४.३८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
आयटी, बँक, एफएमसीजी प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. तर मेटल, फार्मा, रियल्टी, पॉवर, ऑईल आणि गॅस, कॅपिटल गुड्स १-२ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी १.५ टक्क्यांनी वाढले.
संबंधित बातम्या 

भारतीय ग्रोथवाढीबरोबर तुमचीही वेल्थ ग्रोथ होतेय का?
तेजी कुठवर जाणार? ‘हे’ शेअर्स मिळवून देतील चांगला परतावा
शेअर बाजारातील उत्साहवर्धक नवे उच्चांक!

सेन्सेक्स सुरुवातीला ६९,९२० पर्यंत खाली घसरला होता. त्यानंतर सेन्सेक्सने दिवसाच्या निच्चांकावरुन सुमारे ९०० अंक परत मिळवले. सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, रिलायन्स, कोटक बँक, एनटीपीसी, एसबीआय, टायटन, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वाढले. तर बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, एचसीएल टेक, एम अँड एम, बजाज फिनसर्व्ह, मारुती हे शेअर्स घसरले.

निफ्टी ५० आज २१,०३३ वर खुला झाला होता. त्यानंतर निफ्टी २१,२७२ पर्यंत वाढला. निफ्टी मिडकॅप, निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसस हिरव्या चिन्हात बंद झाले. निफ्टीवर पॉवर ग्रिड, बीपीसीएल, ब्रिटानिया, एचडीएफसी बँक, हिंदाल्को हे शेअर्स १.६१ ते २.३१ टक्क्यांदरम्यान वाढले. दरम्यान, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, सिप्ला, एचसीएल टेक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले.
परदेशी गुंतवणूकदार
सेन्सेक्स आणि निफ्टीच्या घसरणीचे काहीसे कारण परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार ठरले. एनएसईच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, FPI नी बुधवारी १,३२२.०८ कोटी रुपयांची भारतीय शेअर्सची विक्री केली. ख्रिसमसच्या सुट्ट्यांच्या आधी ही विक्री दिसून आली. पण तरीही FPI गुंतवणुकीच्या बाबतीत डिसेंबर हा सर्वोत्तम महिना राहिला. कारण डिसेंबरमध्ये भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी ५६,६१७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
रिकव्हरीसाठी ‘हे’ घटक ठरले महत्त्वाचे
बाँड यिल्ड
फेडरल रिझव्‍‌र्ह लवकरच व्याजदरात कपात करणार असल्याच्या संकेतांमुळे १० वर्षांचे बाँड यिल्ड ३.८५ टक्क्यांच्या पातळीवर घसरले आहे. त्याची सुमारे ५ महिन्यांतील ही निच्चांकी पातळी आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी भारत सरकारचे बाँड यिल्डदेखील किरकोळ कमी झाले.
जागतिक बाजार
अमेरिकेतील शेअर बाजारात बुधवारी घसरण झाली होती. पण गुरुवारी यूएस स्टॉक फ्युचर्स उच्च पातळीवर पोहोचले. एस अँड पी ५०० फ्यूचर्स ०.३९ टक्क्यांनी वाढले, तर नॅस्डॅक १०० फ्यूचर्स ०.४८ टक्क्यांनी वाढले. डाऊ जोन्सशी जोडलेले फ्यूचर्समध्ये वाढ दिसून आली. आशियाई बाजारातील शांघाय कंपोझिट, हाँगकाँगचा हँगसेंग यांनी तेजीत व्यवहार केला.
 
The post पुन्हा खरेदीचा माहौल! सेन्सेक्स ३५८ अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांना ४ लाख कोटींचा फायदा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source