Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : डंकीमध्ये शाहरुख खानचा को-स्टार विक्रम कोचरने खुलासा केला आहे की, तो मन्नत येथे गेला होता. (Shahrukh Mannat) त्याच्या माहितीनुसार, मन्नतमध्ये हाय सिक्युरिटी प्रोटोकॉल्स फॉलो करावं लागतं. विक्रमने मन्नतला भेट दिल्यानंतर आपला अनुभव शेअर केला. तसेच त्याने शाहरुख खानच्या स्वभावाचे कौतुक केले. (Shahrukh Mannat)
संबंधित बातम्या –
HBD Govinda : पानटपरीवर चमकलं भाग्य, चाळीत राहिलेला गोविंदा आज कोट्याधीश
Ankita Lokhande : अंकिताने सुशांतसोबतचे ब्रेकअप ठेवलेलं लपवून; बिग बॉसमध्ये मोठा खुलासा
Jacqueline Fernandez : आता सुकेश चंद्रशेखरने पत्रे पाठवायचे थांबवावे; जॅकलिनची कोर्टात धाव
विक्रम म्हणाला की, शाहरुख खानचा चार्म पाहून तो आश्चर्यचकित झाला. शाहरुखने आपल्या घरी मन्नतवर बोलावलं होतं. तिथे आम्ही त्याला पहिल्यांदा भेटलो. शाहरुखचे घर खूप शानदार आहे. आम्ही लिफ्टने गेलो होतो. तिथे खूप अधिक सुरक्षा व्यवस्था होती. मोठा हॉल होता. मोठी एन्ट्रन्स, लॉबी होती. असं वाटत होतं की, जसे एअरपोर्टवर सिक्युरिटी चेक होतं. किंवा फाईव्ह सटार हॉटेलमध्ये जसे असते, तसे सर्व काही स्कॅन केलं जातं.
अहवालानुसार, शाहरुख खानचे घर २०० कोटी रुपयांचे आहे आणि बॉक्सिंग रिंग, टेनिस कोर्ट, बेडरूम्स, स्विमिंग पूल आणि इतर अनेक आकर्षणे यासारख्या भव्य वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते.
View this post on Instagram
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)
जेव्हा आम्ही रुममध्ये गेलो, तेव्हा तो खूप नम्र होता. तो म्हणाला, मी आताच उठलो आहे. थोडा उशीरा झोपून उठतो. चला आता काम करुया. तुम्ही लोक स्क्रिप्टविषयी काय विचार करता? चला आता वाचूया. त्याचे मित्रत्वाच्या नात्याने बोलणं, समान वगणूक देणं अमेझिंग होतं. मी आधी असे कधीच पाहिले नव्हते.
View this post on Instagram
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)
विक्रमच्या मतानुसार, शाहरुख खानसोबत काम करणं खूप सोपं आहे. कारण तो सेटवरदेखील खूप कम्फर्टेबल वातावरण तयार करतो. विक्रम म्हणाला- तो आपल्या स्टार्सचे सल्ले बारकाईने ऐकतो. त्यांना खुल्यापणा चर्चा करण्याची संधी देतो. शाहरुख सोबत काम करत असताना कधीचं असे फिल नाही झालं की, तुम्ही इतक्या मोठ्या स्टारसोबत काम करत आहात. तुमचे बोलणे तो खूप मनापासून ऐकतो.
View this post on Instagram
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)
डंकी आज २१ डिसेंबर रोजी रिलीज झालाय. यामध्ये शाहरुखसोबत तापसी पन्नू, बोमन इरानी, विकी कौशल यांच्याही भूमिका आहेत.
View this post on Instagram
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)
The post ‘मन्नत’वर आहे एअरपोर्टसारखी तगडी सुरक्षा; विक्रम कोचर… appeared first on Bharat Live News Media.