मनी लाँड्रिंग प्रकरणी आप खासदार संजय सिंह यांना दिलासा नाहीच
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी संजय सिंह यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत १० जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या संदर्भातील सुनावणी आज (दि.२१) दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात झाली. यावेळी न्यायालयाने सिंह यांच्या जामीन अर्जावर कोणताच निर्णय दिला नाही. त्यामुळे संजय सिंह यांना अद्याप कोणताही दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे, या संदर्भातील वृत्त पीटीआयने दिले आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात आप खासदार संजय सिंह हे ४ ऑक्टोबरपासून तिहार तुरुंगात आहेत. दरम्यान आज त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालय निर्णय देणार होते, मात्र दिल्ली न्यायालयाने सिंह यांची न्यायालयीन कोठडी १० जानेवारीपर्यंत वाढवली आहे.
Delhi court extends judicial custody of AAP MP Sanjay Singh in excise scam case till January 10
— Press Trust of India (@PTI_News) December 21, 2023
The post मनी लाँड्रिंग प्रकरणी आप खासदार संजय सिंह यांना दिलासा नाहीच appeared first on Bharat Live News Media.