राहुल गांधीच्या पुतळयाला भाजपकडून ‘जोडे मारो’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या अवमानप्रकरणी काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास भाजपतर्फे जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला. माफी मांगो…माफी मागो… राहुल गांधी, कल्याण बॅनर्जी माफी मांगो…, धिक्कार असो…, भारत माता की जय… अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. संसद भवनाच्या पायऱ्यांवर तृणमूल काँग्रेसचे खासदार … The post राहुल गांधीच्या पुतळयाला भाजपकडून ‘जोडे मारो’ appeared first on पुढारी.
राहुल गांधीच्या पुतळयाला भाजपकडून ‘जोडे मारो’


नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या अवमानप्रकरणी काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास भाजपतर्फे जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला. माफी मांगो…माफी मागो… राहुल गांधी, कल्याण बॅनर्जी माफी मांगो…, धिक्कार असो…, भारत माता की जय… अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
संसद भवनाच्या पायऱ्यांवर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती धनखड यांच्या व्यंगत्वाची नक्कल करून अवमान केला. यावेळी उपस्थित असलेले राहुल गांधी नकलेवर हसून दाद देत होते. या घटनेचा निषेध करण्याएेवजी राहुल गांधी घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होते. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरूवारी(दि.२१) रविवार कारंजा परिसरात यानिषेधार्थ जोरदार आंदोलन केले. संवैधानिक पदाचा अपमान करणाऱ्या कल्याण बॅनर्जी व राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या पुतळयाला जोडे मारत निदर्शने केली.
भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव व प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काशिनाथ शिलेदार, सुनिल केदार, ॲड.शाम बडोदे, वसंत उशीर, अमित घुगे, अनिल भालेराव, सुजाता करजगीकर, पवन भगुरकर, अविनाश पाटील, ज्ञानेश्वर काकड, महेश हिरे, उत्तम उगले, ॲड.मिनल भोसले, राजेंद्र महाले, हेमंत शुक्ल, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :

जलजीवन योजनांची होणार चौकशी : मंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश
विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन खात्याने दिले जीवदान

The post राहुल गांधीच्या पुतळयाला भाजपकडून ‘जोडे मारो’ appeared first on Bharat Live News Media.

Go to Source