गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही – आदित्य ठाकरे

गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही – आदित्य ठाकरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. शिंदे गटावर केलेल्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेत आहे.
या बोलताना ठाकरे म्हणाले की, गद्दार गँग जे गुवाहाटीला, गुजरातला पळून गेले त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा काहीही अधिकार नाही. आधी बाळासाहेबांचा फोटो चोरला, नाव चोरले. आमचा पक्ष आणि नाव वापरून स्वतःसाठी राजकारण करण्याचा प्रयत्न झाला.
महाराष्ट्रात वातावरण बिघडवायचे, दंगली घडवायचे प्रयत्न या मिंधे सरकारकडून सुरू आहे. डरपोक आणि गद्दार लोकांनी स्मृतीस्थळावर येऊ नये असे ज्यांना वाटले त्यांनी घोषणाबाजी केली असेल तर त्यात काय चुकीचे आहे? यापुढे महाराष्ट्रच त्यांना दणक्यात उत्तर देणार आहे. त्यांनी निवडणुका लावण्याची हिंमत दाखवावी.
The post गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही – आदित्य ठाकरे appeared first on पुढारी.

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. शिंदे गटावर केलेल्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेत आहे. या बोलताना ठाकरे म्हणाले की, गद्दार गँग जे गुवाहाटीला, गुजरातला पळून गेले त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा काहीही अधिकार नाही. आधी बाळासाहेबांचा …

The post गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही – आदित्य ठाकरे appeared first on पुढारी.

Go to Source