अंकिताने सुशांतसोबतचे ब्रेकअप ठेवलेलं लपवून; बिग बॉसमध्ये खुलासा
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande ) सध्या बिग बॉस १७ व्या सीझनमधून खूपच चर्चेत आली आहे. या घरात अंकिता पती विकी जैनसोबत वेगवेगळ्या टास्कमधून चाहत्यांची मने जिंकत आहे. शोचे सुत्रसंचानक आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खानेनेही तिचे कौतुक केलं आहे. आता बिग बॉसमध्ये अंकिताने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबतच्या ब्रेकअपबद्दलचा एक मोठा खुलासा केला आहे.
संबंधित बातम्या
Jacqueline Fernandez : आता सुकेश चंद्रशेखरने पत्रे पाठवायचे थांबवावे; जॅकलिनची कोर्टात धाव
Ankita Lokhande Birthday : अंकिता पुन्हा एकदा सिद्ध करणार अभिनयाचं कौशल्य; ‘सावरकर’ मध्ये झळकणार
Ankita Lokhande : अंकिता लोखंडे बिग बॉस १७ मध्ये एन्ट्री करण्याचे ‘हे’ कारण
अभिनेत्री अंकिता लोखंडेने ( Ankita Lokhande ) सुशांत सिंह राजपूतसोबतच्या ब्रेकअप झाल्यानंतर तिने ही गोष्ट सर्वापासून खूप दिवस लपवून ठेवली होती, याचे कारण सांगितले आहे. अंकिताला असे वाटत होते की, पुन्हा सर्व काही सुरळीत होईल. तिला तिच्या नात्याबद्दल आशा होत्या. मात्र, तसे झाले नाही. तसेच तिने माझे ब्रेकअप झाल्यानंतर दोन वर्षे कुणालाही याबद्दल समजू नये असेच तिला वाटत होते. असे म्हटसं आहे.
यापुढे अकिंता म्हणाली की, ‘ब्रेकअपनंतर मला अपेक्षा होती की सुशांत सिंह रजपूत परत येईल. कारण आमचे नाते ७ वर्षांचे होते. मी त्याचा अडीच वर्षे वाट पाहिली. हे लवकरच होईल या आसेवर मी कोणालाच काही सांगितले नाही. मी ज्या घरात राहत होते तेथे सगळीकडे आमचे फोटो होते. यानंतर माझ्या आयुष्यात विकी जैन आला. विकीला डेट करायला सुरुवात केली आणि सोशल मीडियावर खूपच ट्रोल केले गेले.’
‘माझ्यामुळे विकीसह मला खूपच त्रास सहन करावा लागला. त्याने मला खूप सपोर्ट केला आहे. मला माहीत नव्हते की, यापुढे काय होणार होतं. अडीच वर्षानंतर मी माझ्या आयुष्यात पुढे गेले. विकी माझ्या आयुष्यात आला आणि त्याने माझी खूपच प्रेमाने काळजी घेतली. विकीने कधीच कोणत्या गोष्टीवर प्रश्न विचारला नाही’. असेही ती यावेळी म्हणाली.
अंकिता लोखंडे अनेक वेळा बिग बॉस १७ च्या घरात सुशांत सिंह राजपूतची आठवण काढत असते. सुशांतने जून २०२० मध्ये जगाचा निरोप घेतला. अंकिता आणि सुशांतची भेट छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
View this post on Instagram
A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)
View this post on Instagram
A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)
The post अंकिताने सुशांतसोबतचे ब्रेकअप ठेवलेलं लपवून; बिग बॉसमध्ये खुलासा appeared first on Bharat Live News Media.