शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम, बँका, आयटी स्टॉक्सना फटका

पुढारी ऑनलाईन : बँका, ऑटो आणि आयटी शेअर्समधील नुकसानीमुळे आज गुरुवारी भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिला. बाजार खुला होताच सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरला. तर निफ्टी २१ हजारांच्या खाली आला. पण त्यानंतर लगेच दोन्ही निर्देशांकांनी काही नुकसान भरून काढण्यात यश मिळवले. सकाळी १० वाजता सेन्सेक्स २५० अंकांनी घसरून ७०,२५५ वर तर निफ्टी ७७ अंकांनी … The post शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम, बँका, आयटी स्टॉक्सना फटका appeared first on पुढारी.

शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम, बँका, आयटी स्टॉक्सना फटका

Bharat Live News Media ऑनलाईन : बँका, ऑटो आणि आयटी शेअर्समधील नुकसानीमुळे आज गुरुवारी भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम राहिला. बाजार खुला होताच सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरला. तर निफ्टी २१ हजारांच्या खाली आला. पण त्यानंतर लगेच दोन्ही निर्देशांकांनी काही नुकसान भरून काढण्यात यश मिळवले. सकाळी १० वाजता सेन्सेक्स २५० अंकांनी घसरून ७०,२५५ वर तर निफ्टी ७७ अंकांनी घसरून २१,०७२ वर होता. (Stock Market Updates)
संबंधित बातम्या 

सेन्सेक्स, निफ्टीचा विक्रमी उच्चांकानंतर यू-टर्न?, बाजारात नफावसुलीचा सपाटा
भारतीय ग्रोथवाढीबरोबर तुमचीही वेल्थ ग्रोथ होतेय का?
तेजी कुठवर जाणार? ‘हे’ शेअर्स मिळवून देतील चांगला परतावा

सेन्सेक्स आज ६९,९२० वर खुला झाला. त्यानंतर तो ७०,२५० वर गेला. सेन्सेक्सवर ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, बजाज फायनान्स हे शेअर्स घसरले आहेत. तर पॉवर ग्रिड, रिलायन्स, टाटा मोटर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

निफ्टी ५० वरील ४५ शेअर्स लाल तर ४ शेअर्स हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. तर एका शेअर्समध्ये काही बदल दिसून आलेला नाही. निफ्टीवर पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायजेस आणि ब्रिटानिया हे वाढले आहेत. तर अॅक्सिस बँक, सिप्ला, लार्सन अँड टुब्रो, बजाज ऑटो, सन फार्मा हे घसरले आहेत.
बँक निफ्टी ३५८ अंकांनी घसरून ४७,०८६ वर आला आहे. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस १४७ अंकांच्या घसरणीसह २१,०५३ वर व्यवहार करत आहे. (Stock Market Updates)
अमेरिकेतील बाजारात काल घसरण झाली होती. त्यानंतर आज आशियाई बाजारात घसरण दिसून येत आहे. प्रमुख आशियाई निर्देशांक जपानचा निक्केई २२५ तसेच शांघाय कंपोझिट लाल चिन्हात व्यवहार करत होते.
The post शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम, बँका, आयटी स्टॉक्सना फटका appeared first on Bharat Live News Media.

Go to Source