स्वारगेट-कात्रज मेट्रोला मिळणार गती; मंत्री उदय सामंत यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वारगेट ते कात्रज भूमिगत आणि खडकवासला ते खराडी मेट्रो मार्गांच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. त्यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात पुणे मेट्रो टप्पा 1 आणि 2 … The post स्वारगेट-कात्रज मेट्रोला मिळणार गती; मंत्री उदय सामंत यांची माहिती appeared first on पुढारी.

स्वारगेट-कात्रज मेट्रोला मिळणार गती; मंत्री उदय सामंत यांची माहिती

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : स्वारगेट ते कात्रज भूमिगत आणि खडकवासला ते खराडी मेट्रो मार्गांच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. त्यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात पुणे मेट्रो टप्पा 1 आणि 2 मध्ये स्थानकांची वाढ करण्यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला मंत्री सामंत यांनी उत्तर देताना ही माहिती दिली.
स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर राज्य शासन त्याचा पाठपुरावा करून मंजुरी घेईल. खडकवासला ते खराडी हा 25.65 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर राज्य शासनाकडे सादर झालेला आहे. तोदेखील मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. या मेट्रोचे शेवटचे स्टेशन खडकवासला धरणापर्यंत असावे, अशी मागणी केलेली आहे. त्याची देखील संयुक्त पाहणी झालेली आहे. तो प्रस्ताव फिजिबिलिटी रिपोर्टसह शासनाकडे सादर केलेला असून, राज्य शासन त्यावर निर्णय घेईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
असे आहे आर्थिक नियोजन
कात्रज-स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गासाठी 3 हजार 668 कोटी रुपयांच्या खर्चापैकी सर्वाधिक 891 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे. पुणे महापालिकेला 655 कोटी रुपये द्यावे लागणार असून, केंद्र सरकारकडून तीनशे कोटी रुपयांचे अनुदान मिळावे, अशी विनंती केली जाणार आहे. उर्वरित 1800 कोटी रुपयांचा खर्च वित्तीय संस्थांकडून उभारण्यात येणार आहे.
‘खडकवासला-खराडी मार्गाचे नियोजन
‘खडकवासला-हडपसर-खराडी’ या मेट्रो मार्गाने सिंहगड रस्त्यावरील नागरिकांना केवळ हडपसर-वाघोलीपर्यंतच पोहोचता येणार नसून, त्यांना पिंपरी आणि हिंजवडीच्या औद्योगिक पट्ट्यापर्यंतसुद्धा सहज पोहोचता येणार आहे. खडकवासला-हडपसर मेट्रो मार्गावर 22 स्थानकांचे मेट्रोकडून नियोजन करण्यात आले आहे. याच संदर्भातील प्रस्ताव मंत्री उदय सामंत आता केंद्र सरकारकडे पाठवणार आहे.
मार्गावरील स्थानके
खडकवासला, दळवेवाडी, नांदेडसिटी, धायरी फाटा, माणिक बाग, हिंगणे चौक, राजाराम ब—ीज, पु.ल.देशपांडे उद्यान, दांडेकर पूल, स्वारगेट नॉर्थ, सेव्हन लव्हज चौक, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेस कोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा साऊथ, मगरपट्टा मेन, मगरपट्टा नॉर्थ, हडपसर रेल्वे स्टेशन, साईनाथनगर, खराडी चौक.
हेही वाचा

सुधाकर बडगुजर-सलीम कुत्ता यांच्यातील पार्टी कुठे व कधी झाली याचा उलगडा
छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या; महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तिघे आरोपी माफीचे साक्षीदार
पांढरी जीभ देते आजारांचे संकेत

The post स्वारगेट-कात्रज मेट्रोला मिळणार गती; मंत्री उदय सामंत यांची माहिती appeared first on Bharat Live News Media.

Go to Source