रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेत उत्तर भारत-दक्षिण भारत ऐक्य

अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात आहे. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पुढे सलग 48 दिवस मंडल पूजा चालणार आहे. मंडल पूजेचे चलन दक्षिण भारतातून आहे. उत्तर भारतात ही प्रथा पाळली जात नाही. अयोध्येतील रामलल्ला मात्र याबाबतीत उत्तर भारत-दक्षिण भारताच्या ऐक्याचे प्रतीक ठरणार आहे. सात हजार विशेष … The post रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेत उत्तर भारत-दक्षिण भारत ऐक्य appeared first on पुढारी.

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेत उत्तर भारत-दक्षिण भारत ऐक्य

अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात आहे. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पुढे सलग 48 दिवस मंडल पूजा चालणार आहे. मंडल पूजेचे चलन दक्षिण भारतातून आहे. उत्तर भारतात ही प्रथा पाळली जात नाही. अयोध्येतील रामलल्ला मात्र याबाबतीत उत्तर भारत-दक्षिण भारताच्या ऐक्याचे प्रतीक ठरणार आहे.
सात हजार विशेष पाहुणे, चार हजार संत, जगभरातील 50 देशांतील निमंत्रित तसेच सर्व राज्यांतील मिळून जवळपास 20 हजार लोक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावतील. प्राणप्रतिष्ठेची ही गर्दी ओसरल्यानंतर 24 जानेवारीपासून मंडल पूजा सुरू होईल. ती 48 दिवस चालेल. (Ram Mandir)
तत्पूर्वी 23 जानेवारीपासूनच सामान्य भाविक रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतील. महत्त्वाचे म्हणजे मंडल पूजा हा उत्तर भारतात फारसा कुणाला माहिती नसलेला विधी आहे. हा विधी दक्षिण भारतात आवर्जून पार पाडला जातो. अयोध्येत ही पूजा तीर्थ क्षेत्राचे संन्यासी आणि पेजावर मठ पीठाधीश्वर जगद्गुरू माध्वाचार्य विश्व प्रसन्न तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. (Ram Mandir)
मुख्य सोहळ्यानंतर अयोध्येत 48 दिवस होणार मंडल पूजा
मंडल पूजेत काय?

पूजेत सर्वांत आधी गणपतीबाप्पाला आवाहन केले जाते.
दररोज रामलल्लाला चांदीच्या कलशांतून अभिषेक केला जाईल.
विद्वान आचार्य चतुर्वेदासह दिव्य ग्रंथांची पारायणेही करतील.
या पूजेने श्रीहरी प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे.

मंडल पूजा-नियम

पूजेदरम्यान 48 दिवस उपवास ठेवतात.
ब्रह्मचर्य, सर्वसंगपरित्यागाचे पालन.
षडरिपूंपासून मुक्त होऊन सतत ईश्वराचे ध्यान.
मकर संक्रांतीपासून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची धामधूम सुरू होईल.
रामलल्लाला शरयू नदीसह अन्य पवित्र नद्यांच्या जलाने न्हाऊ घातले जाईल.
अयोध्या शहरातून रामलल्लाला मिरवणुकीने फिरायला नेले जाईल.
प्राणप्रतिष्ठेपूर्वी डझनोगणती अनुष्ठाने पार पाडली जातील.

हेही वाचा :

Kolhapur News : महामार्गावर भरावाऐवजी पिलर टाकूनच पूल; मंत्री गडकरींची ग्वाही; डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा
Telecom Bill 2023 : बनावट सिम कार्ड घेतल्यास ३ वर्षे जेल, ५० लाख दंड; टेलिकम्युनिकेशन विधेयक लोकसभेत मंजूर
चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन महिन्यात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता

The post रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेत उत्तर भारत-दक्षिण भारत ऐक्य appeared first on Bharat Live News Media.

Go to Source