लोभ नडला : सहायक पोलिस निरीक्षकाला लाच घेताना अटक

पुणे : गंभीर हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 50 हजारांची मागणी करत दहा हजारांची लाच स्वीकारणार्‍या शिरूर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ अटक केली. या निमित्ताने ग्रामीण पोलिस दलातील खाबुगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. राजेंद्र दगडू गवारे असे अटक करण्यात आलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. … The post लोभ नडला : सहायक पोलिस निरीक्षकाला लाच घेताना अटक appeared first on पुढारी.

लोभ नडला : सहायक पोलिस निरीक्षकाला लाच घेताना अटक

पुणे : गंभीर हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 50 हजारांची मागणी करत दहा हजारांची लाच स्वीकारणार्‍या शिरूर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ अटक केली. या निमित्ताने ग्रामीण पोलिस दलातील खाबुगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
राजेंद्र दगडू गवारे असे अटक करण्यात आलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत एका 65 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली होती. एप्रिल 2021 मध्ये तक्रारदार व त्यांचा मुलगा याच्यावर भादंवि कलम 326, 323, 504 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात राजेंद्र गवारे शिरूर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असताना तो तक्रारदारांना या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 50 हजारांच्या लाचेची मागणी करत होता.
परंतु, लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदारांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने हा सापळा रचून गवारे याला तडजोडीअंती 10 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. एसीबीचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, उपअधीक्षक नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रणेता सांगोलकर यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा

Cow Milk : गाय दुधाला 5 रुपये अनुदान
एचआयव्हीग्रस्तांमधील क्षयराेग प्रतिबंधासाठी ससूनमध्ये अभ्यास
ज्ञानाधिष्ठित समाजातील पीएचडीचे महत्त्व

The post लोभ नडला : सहायक पोलिस निरीक्षकाला लाच घेताना अटक appeared first on Bharat Live News Media.

Go to Source